ब्लॅक अँड व्हाईट विशेष लेख
जुलै दोन हजार साली या देशात, ‘ कौन बनेगा करोडपती’ नावाचा एक आगळावेगळा खेळ, दूरदर्शन वर दिसू लागला. नुकतीच या खेळाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली. या खेळाचं सादरीकरण महानायक अभिताभ बच्चन करतात.
हम हिन्दुस्तानी नावाच्या, एका फारशा यश न मिळालेल्या चित्रपटातून नवोदित म्हणून अभिताभ बच्चन यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं . हरिवंशराय बच्चन या आपल्या देशातील अतिशय लाडक्या अशा साहित्यिकाचे,लोकप्रिय असे, अभिनेता बच्चन हे सुपुत्र होय. धीर गंभीर आवाज उंच शरीरयष्टी अभिनयाची खोली आणि जाण यामुळे अभिताभ बच्चन ने अनेक वर्ष समाजमनावर ,चित्रपट प्रेमींच्या हृदयावर राज्य केलं .पॅरिस,फ्रान्स येथे, लोरी म्युझियमच्या बेसमेंट मध्ये फोटो असलेला, अभिताभ बच्चन हा मला वाटतं एकमेव भारतीय नट आहे.
आनंद आणि अभिमान या दोन चित्रपटांनी भारतीय चित्रपट सृष्टीला एक नवा सुपरस्टार दिला ते म्हणजे अभिताभ बच्चन !अमिताभ बच्चन सरांनी प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्ष राज्य केलं .अनेक बक्षिसं मिळवली. त्यानंतर जया भादुरी बरोबर लग्न करून अभिताभ बच्चन सर स्थिरस्थावर झाले. श्वेता आणि अभिषेक या दोन मुलांसमवेत त्याने एक परिपूर्ण आदर्श संसार केला.
त्याच्या जीवनात नंतर ए बी सी एल या कंपनीच्या, काही कारणांमुळे बंद पडल्यामुळे बरेच वादळ उमटलं .मात्र त्याच दरम्यान अभिताभ बच्चन सर यांना “कौन बनेगा करोडपती” हा खेळ ,त्या वेळी स्टार(आता सोनी टीव्हीवर) सादर करण्याची संधी मिळाली. सिद्धार्थ बसू यांनी who will be millionaires? या परदेशी game show संकल्पनेवर आधारित हा खेळ चालू केला. हो,तेव्हा कुणाला वाटलंही नव्हतं की या खेळाचे सहाशेहून अधिक कार्यक्रम होतील. मराठीमध्ये देखील या खेळाची “ कोण होईल करोडपती?” असा देखील कार्यक्रम सोनी टीवी तर्फे सादर करण्यात आला. आज पर्यंत या शो चे , हिन्दी कार्यक्रमाचे सहाशे मालिका भाग टीव्हीवर दाखवण्यात आले आहे .वर्षाहून वर्ष जात राहिली पण अभिताभ बच्चन ची मोहिनी संपली नाही. मध्यंतरी तब्येतीच्या कारणामुळे एका ‘कौन बनेगा करोडपती?” चे सादरीकरण शाहरुख खान याने देखील केले होते. अभिताभ बच्चन सारखा टी आर पी कुणालाच मिळाला नाही .अभिताभ बच्चन ने सादर केलेला हा कार्यक्रम भावनिक आणि बौद्धिक या दोन्ही पातळीवर मानवाला आवडतो.
ज्ञानही आपको आप का हक दिलाता है!, आप जवाब देने का वक्त आ गया!, हर चीज को ब्रेक लिखता है सपनोंको नही! अशा वेगवेगळ्या, चांगल्या चांगल्या आकर्षक अशा घोषणांनी हा कार्यक्रम अधिकच गाजत राहिला. सर्व वयातील, सर्व स्तरावरील रसिकांना आवडेल असा , आणि गरीब-श्रीमंत सगळ्यांशी संवाद साधण्याचं कौशल्य अभिताभ बच्चन सर दाखवतात.
जानेवारी 2000 त who will be millionaires?चे परदेशातील शूटिंग बघून आल्यानंतर अभिताभ बच्चन यांना घेऊन केबीसी लॉन्च करायचं ठरलं. त्यावेळी हा कार्यक्रम स्टार टीव्हीवर दाखवला जाई.हे टीव्ही चॅनेल हे भारतातले एक नंबर चे झाले .केवळ टीव्ही चॅनेल नव्हे तर अभिताभ बच्चन यांच्या प्रतिमेला देखील या कार्यक्रमाने खूप सुंदर असा सोनेरी मुलामा चढवला. अभिताभ बच्चन सरांचे रसिक करोडो निर्माण झाले. प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात, तो खऱ्या अर्थाने नायक बनला. केवळ आपल्या ज्ञानावर आणि कुणाची ओळख नसताना, फारसा वशिला नसताना ,आपण कसं काय यशस्वी होणार ?असे मनात असलेले अडचणींचे विचार बाजूला टाकून, अनेक तरुण तरुणी अभ्यास करू लागले. खेडोपाडी,झोपडपट्टी पासून महानगरांमध्ये देखील लोकांनी आपल्या ज्ञानाची कक्षा विस्तारली.
‘कौन बनेगा करोडपती’ चा हॉट सीटवर जाणे,निदान कार्यक्रमात चांगला भाग घेणे हा देखील सर्वसामान्य माणसांच्या जीवनातील स्वप्न पूर्ती क्षण बनला.एक आवश्यक स्वप्न बनून बसला. नियमानुसार कौन बनेगा करोडपती चा आराखडा बदलता येत नाही. पण दरवर्षी येणारे वेगवेगळे सहभागी, तत्कालीन सामाजिक परिस्थिती, त्या त्यावेळेस चे सण, त्या त्या वेळची परिस्थिती, यावरून दरवर्षी कौन बनेगा करोडपती या खेळांमध्ये नावीन्य आणायचा प्रयत्न केला जातो.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाची एक कथा असते प्रत्येकाने जीवनात यशस्वी होण्यासाठी धडपड केलेली असते. तडजोड केलेली असते अनेक आव्हानांना तोंड दिलेले असते.अडथळ्याची शर्यत पार केलेली असते. या सगळ्या प्रश्नांमधून विविध समस्यांमधून, समाजाच्या वेगवेगळ्या दुखांमधून आपण काहीतरी वेगळं करून दाखवावं आपण नाम मिळवावं, आपलं यश सिद्ध करावं अशा बऱ्याच जणांना वाटत असतं. आपल्या सामान्य जीवनात काहीतरी असामान्य दाखवण्यासाठी केबीसीच्या सेटवर जाण्याचा आनंद अवर्णनीय ठरतो .यावर्षी लॉक डाऊन मुळे वेगळ्या प्रकारे कोण बनेगा करोडपती’च्या ऑडिशन्स ऑनलाईन घेण्यात आल्या. ज्यांच्या ऑडिशन्स ऑनलाईन घेण्यात आल्या,त्यांची खाजगी माहितीही फिल्म द्वारे सादर करुन घेण्यात आली . इतर इंटरव्यू साठी 24 पानांचा एक फॉर्म भरून घेण्यात आला आहे.(त्यातील मी पण एक आहे)
बघू या ‘कौन बनेगा करोडपती’ पर्यंत जायचं भाग्य कुणाला मिळतं. थोडेफार पैसे मिळणे व तो चेक हातात घेणं त्या खुर्चीवर बसणं हा आनंद निराळाच असतो. एवढे पैसे आयुष्यात कधीच न पाहिलेले लोक असतात .कधीतर एवढी प्रसिद्धी जीवनात न मिळालेली माणसे देखील असतात .(मी पण)दोन्ही गोष्टींनी सहभागी लोकांच जीवन बदलत .काही काही राज्यांमध्ये कोण बनेगा करोडपती’च्या प्रश्नांची उत्तर कशी द्यावी, शो मध्ये सहभागी कसे व्हावे याची काही काही कोचींग क्लासेस चालवले जातात.पंचवीस वर्षे, 14 वार्षिक आणि 600 भाग हा शो चालू आहे.खूप मोठी स्वप्न घेऊन, काही अपेक्षा घेऊन लोक शोमध्ये येतात त्यांना एक संधी मिळाली तर चांगलंच आहे .
अभिताभ बच्चन सर कार्यक्रमाची सुरुवात देवी और सज्जनो या वाक्यांनी करतात. त्यांचे काही काही खाजगी अनुभव सांगतात. शिवाय त्यांच्या वडिलांच्या म्हणजे कै हरिवंशराय बच्चन यांच्या काही कविता वाचून दाखवतात. येणाऱ्या सहभागी लोकांशी कधी तोडून, वागत नाही तर त्यांच्याशी सहसंवेदनेने बोलतात.
चार शब्द कौतुकाचे, औपचारिकतेचे ठीकठाक बोलायला काही हरकत आहे का?करोडपती करोडोपती असलेल्या अमिताभ बच्चन सहभागी माणसाला पाच हजार रुपयाचं काय करणार ?असं सुद्धा अतिशय कौतुकाने विचारतात. समाजातील परिस्थितीची त्यांना चांगली जाण आहे.मानसिक आरोग्यासाठी हितकर असाच हा खेळ आहे. पैसे तर काय थोडीफार पुढेमागे मिळतात. आपापल्या गतीनुसार आपापल्या नशिबा नुसार हॉट सीटवर नंबर लागतोच असेही नाही पण त्या खेळात भाग घेण्याचा आनंद देखील खूप निराळा आहे.
जुलै 2000 ला हा खेळ सुरू झाला आत्तापर्यंत 2025 पर्यंत या खेळाने आपल्या देशाला 17 करोडपती दिले. नरूला बंधूंनी या खेळात सात कोटी जिंकले. अभिताभ बच्चन द्वारे पुन्हा 2025 कोण बनेगा करोडपती चा,25 वर्षाचा शो सुरू होत आहे .बघू या भारताला पुढचा करोडपती कोण मिळतो?
मला मिळाले तर सर्व पैसे मी मलेरिया संशोधनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कोष ला देणार आहे.
***
Post a Comment
0 Comments