Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त

 

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आल्याने त्यावर प्रशासक म्हणून ठाणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे किशोर मांडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत २२ एप्रिल २०२४ मध्ये संपुष्टात आली होती. समितीच्या विनंतीवरून पण संचनालयातर्फे सहा महिन्यांची म्हणजेच २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत चा कार्यकाळ समितीसाठी वाढवून देण्यात आला होता. ३१ डिसेंबर २०२४ अखेर राज्यातील सर्वच बाजार समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय झाल्याने व आचारसंहितेच्या कालावधीत निवडणुका होणार नसल्याने.

      कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय कामकाज सुरळीत चालण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम १५ (अ) च्या तरतुदीनुसार प्रशासक नेमणूक करणे आवश्यक आहे. कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती, कल्याण, जिल्हा ठाणे या बाजार समितीवर प्रशासक म्हणून किशोर मांडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे यांची नियुक्ती करणेबाबत आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी पत्र  ३१ डिसेंबर २०२४ रोजी पण संचनालयातर्फे पणन संचालक विकास रसाळ यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले असून ते सोशल मिडियावर वायरल झाले आहे.

      याबाबत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव संजय एगडे यांना विचारले असता, आपल्याला असे कोणतेही पत्र प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. बाजार समितीवर संचालक मंडळ आणि प्रशासक नसल्याने बाजारसमितीचे 45 कर्मचारी आणि 20 सुरक्षारक्षक यांचा पगार अद्यापही झाला नसल्याचे सांगितले.    

दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती नोकर भरती प्रक्रिया सुरू असून ती पूर्णत्वाला नेण्यासाठी आणि आपलं चांगभलं करण्यासाठी पत्र निघूनही प्रशासक येत नसल्याच्या खमंग चर्चा यानिमित्ताने कृषी उत्पन्न बाजारसमिती वर्तुळात रंगल्या आहेत. तर माजी सभापती वंडार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामाला गती मिळण्यासाठी प्रशासक येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.       

 




Post a Comment

0 Comments