Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ठाणे जिल्हा परिषदेच्या भ्रष्ट व भोंगळ कारभारा विरोधात योगिता शिर्के यांचे आमरण उपोषण

 


                  ब्लॅक अँड व्हाईट मुरबाड-ठाणे प्रतिनिधी

ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाच्या भ्रष्ट आणि भोंगळ कारभारा विरोधात मुरबाड येथिल सामाजिक कार्यकर्त्यां तथा माहिती अधिकार फेडरेशनच्या मुरबाड महिला तालुका अध्यक्षा योगिता शिर्के यांनी उपोषणाचे हत्यार उगारले असून विविध विषयांवर संदर्भात न्याय मिळत नसल्याने अखेर जिल्हा परिषद ठाणे येथे उपोषणाला बसल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी केंद्र नढई येथिल सेविकेला 2021 पासून सेवेत नसताना दिला गेलेला पगाराची चौकशी व्हावी, अंगणवाडी केंद्र बळेगाव येथिल मदतनीस पदाच्या नियुक्ति बाबत पात्र ठरलेल्या अर्जदारास 7-8 वर्ष वंचित ठेवणार्या अधिकार्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोशी येथिल सन 2020 पासून ते आजपर्यत प्राप्त झालेल्या निधीचे विशेष लेखापरीक्षण करावे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सरळगाव येथिल लाभार्थ्यांना सोनोग्राफीसाठी प्राप्त झालेल्या अनुदानाचे पैसे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः च्या नावावर चेक काढून स्वतःच्या बँक खात्यात वटवने अशा विविध मागण्यांसाठी ठाणे जिल्हा परिषदे समोर आमरण उपोषणाला बसल्या असून यापूर्वी अनेक वेळा तक्रारी, अर्ज विनंत्या करून न्यायन मिळाल्याने अखेर उपोषणाचे हत्यार उगारले असून माहिती अधिकार फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपोषण सुरू असून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी फेडरेशनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शंकर वडवले, अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे आण्णा साळवे, शहापूर तालुका अध्यक्ष देविदास जाधव, मुरबाड अध्यक्ष दिलीप पवार, भिवंडी अध्यक्ष शांताराम पाटिल, पुष्पा पवार, रुपाली जाधव, दयानंद उल्मिक, सोमनाथ पोगेरे, कैलास भोईर, योगेश त्रिभुवन यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

Post a Comment

0 Comments