पोलिसांच्या कारवाई मुळे शहरात सुरक्षिततेचे वातावरण
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण परिमंडळ-3 मधील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत मोकळी मैदानी,निर्जनस्थळे व रोडवरील आस्थापना यांच्यावर पोलिसांतर्फे धडक कारवाई सुरू असून, गुरुवार रात्री विहित वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू असलेल्या एकूण ४0 आस्थापनावर कारवाई करण्यात आली.तसेच उघड्यावर व निर्जस्थळी एकूण ८१ नशेखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा एकुण 121 कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर अतिवेगाने मोटार सायकल चालवणे आणि ट्रिपल सीट वाहन चालवणे या बद्दल एकूण 101 जणांवर कारवाई करण्यात आली.
वरील प्रमाणे पोलिसांची अशीच धडक कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.अशी ग्वाही उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे.
.jpg)



Post a Comment
0 Comments