आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर् स्पर्धा
30 हजार विद्यार्थ्यांनी दिली
प्रदर्शनाला भेट
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
193 देशांच्या ग्लोबल करन्सी नोट व पोस्टल स्टॅम्प प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर् स्पर्धा देखील पार पडली. दोन दिवस आयोजित केलेल्या या प्रदर्शनाला सुमारे 30 हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी 2014 पासून आयोजक संतोष डावखर हे डावखर फाउंडेशन, रिजन्सी ग्रुप, समर्थ पेट्रोलियम, एनए सोल्युशन, डावखर फाउंडेशन, डावखर फिल्म्स विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करत आहेत. या वर्षी परिसरातील 45 शाळा सहभागी झाल्या आहेत.
विद्यार्थ्यां मधील कला गुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन पोस्टर् स्पर्धा तसेच ग्लोबल करन्सी नोट व पोस्टल स्टॅम्प प्रदर्शनाचे आयोजन डोंबिवली पूर्वेतील रिजन्सी अनंतम येथे दोन दिवस करण्यात आले होते. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य होते. शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल आणि पोस्टल स्टॅम्प बद्दल संपूर्ण माहिती घेण्याची संधी उपलब्ध झाली. 193 देशांच्या नोट्स आणि पोस्टल स्टॅम्प प्रदर्शन तसेच विज्ञान या विषयांमध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली. जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र देण्यात आले असल्याची माहिती संतोष डावखर यांनी दिली.
Post a Comment
0 Comments