Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवली स्टेशन परिसर झाला मोकळा

परिसरात रस्ता आणि पदपथ अडवून व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई....

ब्लॅक अँड व्हाईट ( डोंबिवली ) शरद शहाणे 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली स्टेशन परिसरातील "फ" "वार्डात रस्ता आणि पदपथाचा वापर करून भाजीवाले आणि इतर व्यवसायिक राजरोसपणे व्यवसाय करीत असतात त्यामुळे महापालिकेचा कर भरणाऱ्या सामान्य नागरिकांना अनेक प्रकारचा त्रास सोसावा लागतो रस्त्याने धड चालता येत नाही वाहनांना होणाऱ्या नेहमीच्या अडथळे महापालिकेच्या बस सुद्धा हळुवारपणे जातात हे सर्व अनेक वर्षांपासून चालू आहे अनेक वेळा अधिकारी कर्मचारी कारवाई करतातच परंतु सर्वच अधिकारी सर्व अधिकार  संपूर्ण वापर करीत नाही त्यात काही राजकीय,  सामाजिक हस्तक्षेप चालूच असतात परंतु गेल्या काही महिन्यांपासून या वार्डात अत्यंत कठोर आणि सर्व कायदे वापरून कारवाई केली जात आहे त्यामुळे रस्ता आणि फुटपाथ अडवून व्यवसाय करणाऱ्या चे धाबे दणाणले ही कारवाई वॉर्ड ऑफिसर हेमा मुंबरकर आणि त्यांचे कर्मचारी सातत्याने आणि अत्यंत कठोर पद्धतीने सर्व कायद्यांचे आणि वरिष्ठांचे सर्व आदेशांचे पालन करून अत्यंत कठोर कारवाई करीत आहे त्यामुळे प्रभागातील नागरिक आणि दुकानदार जे कर भरतात या सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे आणि वाहनांचे अडथळे अनेक प्रकाराने दूर झालेले आहेत.

सामान्य नागरिक वॉर्ड ऑफिसर यांना भेटून धन्यवाद देतात आणि म्हणतात असेच कायम काम करावं अशी आशा बाळगतात 

Post a Comment

0 Comments