कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने हिवाळीअधिवेशनात उपमुख्यमंत्री व आमदारांना दिले निवेदन
ब्लॅक अँड व्हाईट नागपूर वृत्तसेवा : कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ रिक्षा टॅक्सी चालकांचे ज्वलंत भेडसावणाऱ्या समस्या प्रश्न सोडविण्याबाबत सतत प्रयत्न व पाठपुरावा केला जात आहे. कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी पदाधिकाऱ्यांच्या समवेत नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले, दादा भुसे, आमदार किसन कथोरे, दौलत दरोडा यांची भेट घेऊन निवेदन दिले. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात प्रणव पेणकर यांच्या समवेत कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अविनाश खिलारे, जितेंद्र पवार, संतोष नवले, भुषण लांडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रिक्षा टॅक्सी चालकांना वाहतुक पोलीसांकडून फोटो शूट इ-चलन पंधराशे रुपये दंड कमी करावा वाहतुक पोलीसांकडून डिव्हाइस विना खाजगी मोबाईल फोन वर फोटो शूट इ-चलन कारवाई करु नये. रिक्षा टॅक्सीचीं अमाप वाढणारी संख्या नियंत्रण खुले नवीन रिक्षा टॅक्सी परवाने वाटप बंद करावी इलेक्ट्रिक इ -रिक्षांना परवाना सक्ती बंधनकारक करावा अशा विविध प्रकारच्या समस्यांचा निवेदनात समावेश आहे. रिक्षा टॅक्सी चालकांच्या ज्वलंत भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने केले जातील महायुतीचे सरकार रिक्षा टॅक्सी चालकांच्या ज्वलंत प्रश्नांची दखल घेईल असे प्रणव पेणकर यांनी स्पष्ट केले.
.jpg)


Post a Comment
0 Comments