ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
सद्यास्थितीत सर्वत्र भेडसावणारी धुळीच्या प्रदुषणाची समस्या कमी करण्याच्या दृष्टीकोनातून कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या निर्देशान्वये गेल्या महिन्याभरापासून महापालिका परिक्षेत्रात रात्रीच्या वेळी म्हणजे रात्री 10 ते 3 कालावधीत विशेष स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. ही विशेष स्वच्छता मोहिम 4 पॉवर स्विपींग मशीन, 200 कर्मचारी यांच्या सहाय्याने राबविण्यात येत आहे. रात्रीच्या कालावधीत डीप क्लिनींग व सकाळच्या प्रहरात महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांमार्फत कचरा उचलण्याच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक पॉवर स्विपींग मशीनच्या मागे 50 कर्मचाऱ्यांची टिम ठेवून, डीप क्लिनींग करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली.
या पॉवर स्विपींग मशीन्समध्ये सुमारे 3 टन धुळ संकलीत करण्याची क्षमता असून, रस्त्यावरुन मशीनद्वारे साफ-सफाई करताना धुळ उडू नये म्हणून त्यावर वॉटर स्प्रींकलर बसविण्यात आले आहेत. तसेच रस्त्यातील दुभाजक धुण्यासाठी यामध्ये हायप्रेशर जेट स्प्रेची यंत्रणा उपलब्ध करण्यात आलेली आहे. ही मशीन सक्शन तत्वावर आधारीत असून, सक्शन यंत्रणेद्वारे रस्त्यावरील धुळ, माती शोषून घेतली जावून, मशीनच्या मागील टँक गोळा होते. केंद्र शासनाच्या नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम अंतर्गत या गाड्या घेण्यात आल्या असून, पॉवर स्विपींग मशीन या सीएनजीवर चालत असल्याने, धुरामुळे होणा-या प्रदुषणाला आळा बसतो. कल्याण शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरण पुरक होण्यासाठी हा उपक्रम राबवित असल्याचे माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांनी दिली आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments