Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नववर्ष साजरे करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आवाहन

 

नववर्ष साजरे करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आवाहन

कल्याण प्रतिनिधी.

राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे यांच्या कडून 31 डिसेंबर नववर्ष स्वागत निमित्ताने नागरिकांसाठी आणि मद्य विक्रेत्यांसाठी विशेष नियमावली लागू करण्यात आली आहे.त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पोलिस यंत्रणा आणि शासकीय यंत्रणा पूर्णपणे तयार असून,शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे मद्य विक्रेत्या आस्थापंनाना 31 डिसेंबर साठी विशेष वेळ वाढवून देण्यात आली आहे.रात्री 10/30 ते 1 वाजे पर्यंत आणि पोलिस आयुक्तलयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री 11/30ते पहाटे 5 वाजे पर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे.


मद्यविक्री आस्थापनामध्ये परराज्यातील मद्य तसेच बनावट मद्य विक्री होणार नाही याबाबत सर्व पथकांना सूचना देण्यात आल्या असल्याने त्यांच्याकडून परराज्यातील मद्यविक्री होणार नाही याबाबत योग्य खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.

    नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता राज्य उत्पादन शुल्क,ठाणे जिल्हा  यांच्या कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना अवैध मद्य विक्री व हातभट्टी विकीवर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

 तसेच महाराष्ट्र राज्यात परराज्यातून येणाऱ्या मद्यावर कारवाई करण्याकरीता प्रमुख रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे विभागाशी समन्वय साधून संशयित आढळून येणाऱ्या व्यक्तीच्या सामानाची तपासणी तसेच रात्रीच्या वेळी गस्त घालण्यात येवून परराज्यातून येणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी करण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

   नववर्षानिमित्त या जिल्हयात विविध ठिकाणी मोठया प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने विविध कार्यक्रमाच्या ठिकाणी एकदिवशीय परवाना न घेता विनापरवाना मद्य वितरण होत असल्यास संबंधीतावर कठेार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जिल्हयातील  रिसार्ट, हॉटेल, कॉटेज, फार्महाऊस या विभागाची तात्पुरती कल्ब अनुज्ञप्ती प्राप्त करुनच कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

या विभागाची विधीग्राह्य अनुज्ञप्ती धारण न करता अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल व ढाब्यावर कठोर कारवाई करावी तसेच अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल, ढाब्याचे मालक व जागामालक यांचेवर प्रामुख्याने गुन्हा नोंद करण्यांबाबत सूचना या विभागातील अधिका-यांना देण्यात आल्या आहेत.

असे असले तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कल्याण मधील निरीक्षक सुनील कणसे यांनी या संदर्भात माहिती देतांना सांगितले की "नागरिकांनी नववर्षाचे स्वागत करतांना भान राखून ,आनंद साजरा करावा.प्रत्येक सोसायटीत नववर्षाचे स्वागत साठी पार्टी आयोजित करतांना स्थानिक पातळीवर परवानगी घेऊनच करावी.इतर दुसऱ्या कोणालाही आपल्या कडून त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी.रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा करू नये,सर्वात महत्वाची बाब म्हणजे कोणत्याही परिस्थितीत दारू पिऊन वाहन चालवू नये,स्वतः बरोबर दुसऱ्याच्याही जीवाला धोका निर्माण करू नये" अशा प्रकारे आपल्या कार्यक्षेत्रात नववर्ष स्वागत करणाऱ्या नागरिकांना मोलाचा सल्ला दिला आहे.

Post a Comment

0 Comments