दुर्गाडीच्या निर्णयाची शासनाने योग्य प्रकारे अंमलबजावणी करावी - माजी मंत्री रवींद्र चव्हाण
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर : दुर्गाडी किल्ल्याच्या निर्णयाची शासनाने योग्य प्रकारे अंमलबजावणी करावी अशी प्रतिक्रिया माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. रवींद्र चव्हाण यांनी आज डोंबिवली जिमखाना येथे पत्रकार परिषद घेत दुर्गाडी किल्ला निकालाबाबत आनंद व्यक्त केला. तसेच या निकालासाठी हिंदूंनी सुमारे ४-५ दशकांपासून केलेल्या अथक प्रयत्नांचा आढावा मांडला. याप्रसंगी हिंदू मंचाचे दिनेश देशमुख, विश्व हिंदू परिषदेचे पराग तेली, सुरेंद्र भालेकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना रवींद्र चव्हाण यांनी दुर्गाडी किल्ल्याबाबत न्यायालयाने निर्णय दिल्याबद्दल न्यायालयाचे आभार मानले. या निर्णयाची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यात यावी अशी शासनाला विनंती केली. यासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्व. आनंद दिघे, हिंदू संघटनांनी मेहनत घेतली. मलंग गडाचा विषय देखील अनेक वर्षे प्रलंबित आहे त्या विषयात लक्ष घालून मार्गस्थ करणे देखील गरजेचे आहे. 48 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा निर्णय झाला हे निर्णय त्या त्या वेळी झाले असते तर हा प्रश्न लवकर मार्गी लागला असता असे चव्हाण यांनी सांगितले.
तर याबाबत हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी 1971 साली ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने ही वास्तू मंदिर म्हणून जाहीर केलेली होती. या वास्तूमध्ये मंदिर आहे मसजीदला कुठली खिडकी नसते. मूर्तीला उभे राहण्यासाठी जागा देखील आहे. देवालय पाहून देवालयाच्या दृष्टीने ही मंदिराची जागा आहे हे शासनाने स्पष्ट केलं होतं. मात्र मुस्लिम समाजाने 1976 ला मसजीद असल्याचा दावा केला त्यानंतर ठाण्यातून कल्याण न्यायालयात या प्रकारचा दावा वर्ग करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने शासनाने दिलेला निर्णय योग्य असल्याचे सांगतले आहेः त्यामुळे न्यायालयाचे आम्ही आभार मानत असल्याचे हिंदू मंचचे अध्यक्ष दिनेश देशमुख यांनी सांगितले.
.jpg)

Post a Comment
0 Comments