कमलादेवी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे रक्तदान शिबीर
ब्लॅक अँड व्हाईट
(उल्हासनगर) वार्ताहर : रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान असुन समाजात नव्या पिढीला रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कमलादेवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.विठ्ठलवाडी येथे स्थित या महाविद्यालयाच्या
राष्ट्रीय सेवा योजने मार्फत आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी स्वयं स्फूर्तीने पुढाकार घेऊन ७० पेक्षा अधिक रक्त बाटल्या संकलीत केल्या. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे संस्था अध्यक्ष सदानंद बाबा तिवारी यांनी विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुथा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश मुथा कमलादेवी महाविद्यालया चे अध्यक्ष श्री सदानंद तिवारी उपस्थित होते. तसेच, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सिंग, आय क्यु ए सी समन्वयक अश्विनी राणे, अधीक्षक सचिन चौधरी यांनी या शिबिराच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. हे रक्तदान शिबिर लाईफ लाईन ब्लड सेंटर कल्याण यांच्या मदतीने आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात कमलादेवी महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक वर्गानेही रक्तदान केले. त्याच बरोबर कॉलेजबाह्य नागरिकांनी देखील सहभाग दर्शवला.
.jpg)

Post a Comment
0 Comments