उल्हासनगर महापालिकेचा टीबी मुक्त शहराचा संकल्प
ब्लॅक अँड व्हाईट
(उल्हासनगर) वार्ताहर : देशभरात क्षयरोग नियंत्रण करण्यासाठी सरकार व सामाजिक संस्था युद्ध पातळीवर प्रयत्न शील आहेत. उल्हासनगर शहरात टिबी हद्दपार करण्यासाठी प्रशासन व आरोग्य विभाग देखील अनेक उपक्रमांमधून समाजामध्ये या आजाराच्या उपचारांच्या दृष्टीने जनजागृती करत आहे. भारत क्षयरोग मुक्त करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी धडपडत असतांना उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून क्षय दिनानिमित्त कॅम्प २ मधील नागरी आरोग्य केंद्र - २ यांनी ' १०० दिवस टीबी मुक्ती साठी ' या अभियानाचे उद्घाटन माजी महापौर मीना आयलानी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात रोटरी क्लब विठ्ठलवाडी यांच्याकडून टी.बी. पेशंट यांना राशनकिट देण्यात आले. तसेच, सर्व नागरिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी टीबी हा भारतातून पूर्ण नष्ट व्हावा या विषयी सामुहिक शपथ घेण्यात आली. याप्रसंगी डॉ. मोहिनी धर्मा, सहाय्यक आयुक्त विजय खेडकर, भाजपा महिला नेत्या मंगला चांडा उपस्थित होते.
.jpg)

Post a Comment
0 Comments