Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर येथे सीवाय टिबी टेस्ट मोहीम

 बदलापुरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सीवाय टिबी
टेस्ट  मोहिम 

मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते  या मोहिमेचे उद्घाटन

ब्लॅक अँड व्हाईट (जिल्हा परिषद ठाणे)
प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत दि. 4 डिसेंबर, 2024 रोजी सुप्त अवस्थेतील क्षयरोगाचे लवकरात लवकर निदान होण्यासाठी सीवाय टिबी      (CY TB)  टेस्ट या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या चाचणी मुळे जास्तीत जास्त संशयित क्षयरुग्णांचे खात्रीपूर्वक निदान करून क्षयरोगातून पूर्ण बरे करण्यास मदत मिळणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांनी दिली. यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्वला सपकाळे, जिल्हा क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. तरुलता धानके, डॉ. अर्चना मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती अंबरनाथ डॉ. प्रशांत कनोजा, वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र बदलापूर डॉ. अश्विनी वाणे, वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र बदलापूर डॉ. केतकी गायकवाड तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आशा स्वयंसेविका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर संजीवनी पाटील यांनी रेखाटलेली आरोग्य शिक्षणपर रांगोळी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.

Post a Comment

0 Comments