Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

एलिफंटाला जाणारी बोट समुद्रात बुडाली,

 

एलिफंटाला जाणारी बोट समुद्रात बुडाली 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली धक्कादायक माहिती

मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणाऱ्या नीलकमल नावाच्या प्रवाशी बोटीला एक स्पीड बोट धडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर:एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

मला प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्या बोटीवर अंदाजे 30 ते 35 लोक होते. त्यापैकी 20 जणांना वाचवण्यात यश आले आहे. प्राथमिक माहिती अशी आहे की, 5 ते 7 लोक अजूनही बेपत्ता आहेत. मी शोध घेईन. मला सविस्तर माहिती मिळताच दुपारी 3.15 वाजता बोट एलिफंटाकडे रवाना झाली होती, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली आहे.

रोहित पवारांकडून चौकशीचा मागणी

एलिफंटाकडे जाणारी बोट उलटून काही प्रवाशी बेपत्ता असल्याचं वृत्त धक्कादायक आणि अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि बेपत्ता असलेले प्रवाशी सुखरूप परतावेत, ही प्रार्थना.. पण ही दुर्घटना का घडली याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि अशी घटना पुन्हा घडू नये आणि पर्यटकांचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याकडे सरकारने आवश्यक लक्ष द्यावं, ही विनंती, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

Post a Comment

0 Comments