Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मुरबाड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री कल्पेश माधुरी मनोहर शिंदे प्रथम क्रमांकाचे मानकरी*

 

मुरबाड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात                            श्री. कल्पेश शिंदे प्रथम 

ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर:पंचायत समिती मुरबाड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 16 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ भिवंडी संचलित तळेगाव विभाग हायस्कूल तळेगाव ता मुरबाड या विद्यालयाचे शिक्षक समुपदेशक *श्री कल्पेश मनोहर शिंदे* यांनी  आदर्श भारताचे उद्याचे भावी वैज्ञानिक व गणिततज्ञ घडविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून माध्यमिक शिक्षक अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य* बनवून या स्पर्धेत भाग घेतला होता. या विज्ञान प्रदर्शनात श्री कल्पेश मनोहर शिंदे हे माध्यमिक शिक्षक अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. याबद्दल त्यांना गटविकासअधिकारी सन्माननीय लता गायकवाड मॅडम,गटशिक्षणाधिकारी संप्रदा पानसरे मॅडम, विस्तार अधिकारी श्री संजय थोरात साहेब, टिळक स्कॉलर विद्यालयाच्या प्राचार्या विशाखा मॅडम या मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवचिन्ह,सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आणि सरांची जिल्हास्तरासाठी निवड झाल्याबद्दल सरांचे शालेय सल्लागार समितीचे चेअरमन श्री अरुणबंधू चौधरी,सदस्य श्री दीपक देशमुख,श्री श्रीकांत देशमुख आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ फुलपगारे मॅडम,शिक्षक प्रतिनिधी श्री मंगल कोळी सर ,सर्व शिक्षक,सर्व पालक,सर्व विद्यार्थी पंचक्रोशीतील पालकवर्ग यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्री कल्पेश शिंदे सर यांनी संस्थेच्या व शाळेच्या इतिहासात मानाचा तुरा रोवल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. आणि सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments