अनधिकृत बांधकाम प्रकरणी कल्याणमध्ये विकासकावर एमआरटीपी ऍक्टनुसार गुन्हा दाखल
ब्लॅक अँड व्हाईट (कल्याण)वार्ताहर : कल्याण पश्चिमेतील बंदर रोड येथील आरक्षण क्रमांक 58 खेळाचे मैदान व आरक्षण क्रमांक 97 बेघरांसाठी घरे या आरक्षणाने बाधित क्षेत्रावर तळ +10 मजल्याची युसुफ हाईट्स इमारतीचे बांधकाम केल्याची तक्रार प्राप्त झाल्यामुळे बीट मुकादम यांनी पाहणी करुन सादर केलेल्या अहवालानुसार, इमारतीच्या बांधकामाची अधिकृतता तपासण्यासाठी बांधकामधारक सलमान अनिस डोलारे यांस क प्रभाग कार्यालयात सुनावणीस बोलावले असता, त्यांनी सुनावणी दरम्यान इमारतीच्या बांधकामाची अधिकृतता सिध्द करणारे कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत.
त्यामुळे बांधकामधारक सलमान अनिस डोलारे यांनी "आरक्षण क्रमांक 58 खेळाचे मैदान" व "आरक्षण क्रमांक 97 बेघरांसाठी घरे" या आरक्षणाने बाधित क्षेत्रावर 2015 सालापासून केलेल्या इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमान्वये अनधिकृत घोषीत करुन संबंधित बांधकामधारक यांनी नगररचना विभागाकडील बांधकाम परवानगी व्यतिरिक्त केलेले अनधिकृत बांधकाम स्वत: खर्चाने काढून घेणेबाबत संबंधितास नोटीसीअन्वये कळविण्यात आले होते. परंतू सलमान अनिस डोलारे यांनी सदर इमारतीमध्ये नगरचना विभागाकडील बांधकाम परवानगी व्यतिरिक्त केलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित न करता, सदर इमारतीचे बांधकाम पुर्ण केलेले आहे. त्यामुळे सलमान अनिस डोलारे यांनी अतिक्रमण करुन सदर इमारतीमध्ये वाढीव मजल्यांचे अनधिकृत बांधकाम केल्याचे दिसून आल्यामुळे संबंधित सलमान अनिस डोलारे यांच्याविरुध्द महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52 तसेच भा.द.सं.1860 चे कलम 447 व भा.द.सं.1860 चे कलम 34 नुसार कायदेशीर कारवाई होणेकामी क प्रभागामार्फत कल्याण (पश्चिम) येथील बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदविली आहे.
नागरिकांनी महापालिका परिक्षेत्रातील कुठलीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी या मालमत्तेच्या अधिकृततेची सत्यता पडताळणी करण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागास भेट देवून, शहानिशा करावी अथवा बांधकाम परवानगी प्रमाणपत्र व बांधकाम पुर्णत्वाचे दाखले यावर उपलब्ध असलेल्या क्युआर कोडद्वारे बांधकाम परवानगी/बांधकाम पुर्णत्वाचे दाखले याबाबतच्या सत्यतेची पडताळणी करावी, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी केले आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments