अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांची 75 वी जयंती उत्साहात संपन्न
ब्लॅक अँड व्हाईट (कल्याण) वार्ताहर : अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त साई चौक खडकपाडा कल्याण येथे जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या संयोजनची जबाबदारी समितीने निवृत्ती घुगे आणि संग्राम घुगे यांच्यावर सोपविली होती ती त्यांनी उत्कृष्टपणे कार्यक्रमाचे आयोजन करून पार पाडली.
कार्यक्रमाची सुरुवात गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यावर व कर्तुत्वावर तसेच आठवणी वर आधारित गीतांनी गायक रामहरी कुटे यांनी केली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मुंडे यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना अभिवादन केले.
यावेळी पाहुण्यांचे हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त 75 ज्येष्ठ नागरिकांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर, भारतीय जनता पार्टी पक्षाच्या साधना गायकर , तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते साईनाथ तारे तसेच माजी नगरसेवक सुधीर बासरे असे सर्व पक्षीय नेते पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमास अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक, तसेच खजिनदार रामनाथ दौंड, सहखजिनदार भाऊसाहेब आंधळे, आत्माराम फड ,सुभाष घुगे , माधवराव आव्हाड, ऍड. अनिल लाडवंजारी हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीतील युवा सदस्य अनिल दौंड, किरण दराडे, पीयूष काकड, तसेच आकाश घुगे, सचिन दराडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृती घुगे यांनी केले तर आभार प्रदर्शन ऍड संग्राम घुगे यांनी केले. तसेच नेटके व सुदंर सूत्रसंचालन डॉ विद्या शिर्के यांनी केले .
.jpg)



Post a Comment
0 Comments