Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणमध्ये भूगर्भशास्त्रावर आधारित कार्यशाळा संपन्न


ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
मध्यमुंबई मराठी विज्ञान संघ व कल्याण डोंबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  मध्यमुंबई मराठी विज्ञान संघ, विद्यार्थी व समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी  विविध उपक्रम राबवत आहे. व्याख्याने शैक्षणिक सहली, परीक्षा व कार्यशाळा अश्या माध्यमातून वि‌द्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढवण्याचा सतत प्रयत्न असतो. याच उपक्रमापैकी एक अशी भूगर्भशास्त्रावर आधारित कार्यशाळेचे आयोजन रविवारी कल्याण पश्चिमेतील  शिशुविकास विद्यालय, बेतुरकर पाडा  येथे आयोजित करण्यात आले. त्यामध्ये "पाषाणशास्त्र", "खनिजशास्त्र या विषयावर आधी भूगोलात गती असलेल्या विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन व्याख्यान व नंतर प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनात खनिजे, जीवाश्म, विविध प्रकारचे पाषाण इत्यादी भूशास्त्रीय नमुने ठेवले आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्या सत्रात व्याख्यानात सहभागी झालेल्या विदयार्थ्यांना दगडांच्या नमुन्याचे जवळून निरीक्षण करायला मिळणार आहे.  
या  प्रदर्शनाचे उद्घाटन केडीएमसी उपायुक्त  सोनम देशमुख, विलास लिखार, बालक मंदिर संस्था प्राथमिक शाळा कल्याण, मध्य मुंबई मराठी विज्ञान संस्था अध्यक्ष ज बा म्हात्रे, कार्यवाह  अमेय परब, खजिनदार अंजली वर्तक व इतर पदाधिकारी आणि सभासद  नूतन शिक्षण संस्था अध्यक्ष दीपक ब्रिद, उपाध्यक्ष नंदकुमार देशमुख, संचालक मंगेश पाटील व इतर सभासद, ज्येष्ठ समाजसेवक आत्माराम जोशी तसेच डॉक्टर अभिजीत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. 

डॉक्टर अभिजीत पाटील, ऋजुता पाटील, निखिल चौगले हे कोल्हापूरहून  येऊन त्यांनी प्रदर्शन भरविले आहे.
प्रदर्शनाच्या कार्यामध्ये सर्व सी.आर. सी. प्रमुख, मुख्याध्यापक व एनएसएसचे स्वयंसेवक, शिशुविकास विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  मोहिनी कुलकर्णी यांनी केले.

Post a Comment

0 Comments