Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पाणी बाणी प्रश्ना संदर्भात भाजपाचा नागरिकांसह रिकामे हंडे घेउन बैलगाडी मोर्चा


पाणी टंचाई संदर्भात नागरिकांचा प्रंचड रोष

पाणी बाणी प्रश्ना संदर्भात केडीएमसीच्या अ प्रभाग क्षेत्र कार्यालयावर भाजपाचा नागरिकांसह रिकामे हंडे घेउन  बैलगाडी मोर्चा 

ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर :  कल्याण डोंबिवली मनपाच्या "अ" प्रभागक्षेत्राच्या कार्यालयावर रिकामे हंडे घेऊन बैलगाडी तून येत स्थानिक नागरिकासह भाजपाच्या वतीने  मांडा-टिटवाळा परिसरातील गंभीर पाणीटंचाईला कंटाळून मनपा प्रशासनाविरोधात  मोर्चा मंगळवारी दुपारी काढण्यात आला. पाणी टंचाई प्रश्न लवकर सुटला नाही तर प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा मोर्च्याकरांनी दिला.

मागील अनेक महिन्यांपासून नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता कार्यकरी सराफ यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करुनही कोणतीच उपायोजना करण्यात आली नव्हती. अखेर नागरिकांचा संयमाचा बांध फुटल्याने संतप्त होत रिकाम्याहंडासह "अ" प्रभाग कार्यालयावर भाजपाच्या वतीने  बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व भाजपाचे मोहना मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर यांनी केले होते.


 या पाणी प्रश्नी मोर्च्यामध्ये महिला वर्गासह नागरिक, भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. "धरण आमाच्या ऊशाला कोरड मात्र घश्याला, "पाणी आमच्या हक्काचे नाही उप अभियंता सराफांच्या मालकीचे", "पाणी आता नियमित मिळालेच पाहिजे, पालिकेला जाग आलीच पाहिजे, अश्या घोषवाक्याचे फलक हातात घोषणा देत घोषणांनी परिसर मोर्चे करांनी दणाणून टाकला.

 उप अभियंता सराफ यांची तातडीने बदली करावी.  ,
 मांडा-टिटवाळा येथील सोसायट्यांना जाणिवपूर्वक कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर उपाययोजना करावी, 
 मोहिली जलशुद्धीकरण केंद्र ते मांडा-टिटवाळा मुख्य पाण्याच्या लाईनवर प्रेशरगेज मशीन बसवावे, मुख्य पाण्याच्या लाईनवर अधिकारी यांच्या संगनमताने अनधिकृत नळ जोडण्यात आले असून त्यावर कारवाई करावी,  पावसाळ्यात नदीतील जलपर्णीमुळे रॉ वॉटर पंपींग थांबते, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, 
 काळू नदीवरील बंधाऱ्याची उंची वाढवून गळती थांबवावी. अवैध नळ जोडण्यासाठी घेतले जाणारे ३०-४० हजार रुपयांचे गैरव्यवहार थांबवावेत, प्रभागातील सर्व अनधिकृत नळ जोडण्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मोर्चातील प्रमुख  मागण्या होत्या. 


 पाणीटंचाईच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास तसेच  मागण्या लवकरात लवकर पुर्ण न झाल्यास पालिका मुख्यालयावर मोठ्या संख्येने आंदोलनाचा इशारा माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांसह आंदोलकांनी दिला आहे.  

यावेळी रेल्वे पुलाखालुन पाण्याची लाईन टाकाण्याचे काम हे १५ जानेवारी पर्यंत पुर्ण होणार आहे . तसेच मार्च अखेर पर्यंत मांडा प. साठी बांधण्यात येणा-या टाकीचे देखील काम पुर्ण होणार असल्याने पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार असल्याचे यावेळी (कार्यकरी पाणी पुरवठा विभाग ) अभियंता अशोक घोडे  यांनी सांगितले. तसेच वाढ्त्या लोकसंख्येच्या अनुषंगाने पाणीसाठा वाढवण्याबाबत शासनाशी बोलणे चालु असुन हा प्रश्न मार्गी लागणार आहे . त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी पाणी समस्या आहे त्या त्या ठिकाणी व्यक्तीश : भेट देउन उपायोजना करण्या संदर्भात तातडीने पावले उचलण्यात येतील असे देखील त्यांनी आश्वासित केले.

या मोर्च्यात भाजपाचे शक्तिवान भोईर, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर  नवनाथ पाटील, कैलास पाटील, किरण रोठे , विजय आव्हाड , रुपेश भोईर , नवनाथ पाटील, कैलास पाटील, रमेश कोनकर, प्रमोद घरत  सुनील केदारे ,दिपक कांबळे,सुभाष पिसाळ,सारीका पाटील, जिगीशा जैसवाल, यामिनी चव्हाण  भाजपा पदाधिकारी  कार्यकर्ते आणि यासह असंख्य टिटवाळ्यातील नागरिक उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते .

Post a Comment

0 Comments