ठाणे व टिटवाळा येथे 285 निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान
ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर : मानवसेवेचे ब्रिद जपत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवारी 15 डिसेंबर रोजी ठाणे आणि टिटवाळा येथे आयोजित केलेल्या दोन रक्तदान शिबिरांमध्ये एकूण 285 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले.
ठाणे येथे 209 युनिट रक्तदान ठाणे पूर्व कोपरी येथील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 9 येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरामध्ये एकूण 209 निरंकारी भक्तगणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या शिबिरामध्ये संत निरंकारी रक्तपेढीने 155 तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय रक्तपेढीने 54 युनिट रक्त संकलन केले. संत निरंकारी मिशनच्या ठाण्यातील पाचपाखाडी आणि कोपरी ब्रँचमधील निरंकारी भक्तांनी या शिबिरामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन आमदार संजय केळकर यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच या शिबिरामध्ये आमदार ॲड.निरंजन डावखरे, स्थानिक लोकप्रतिनिधी भरत चव्हाण, नारायण पवार, मालती पाटील, मनोज चव्हाण यांच्या सह संत निरंकारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ठाणे सेक्टर संयोजक डॉ.आर.एस. यादव, कोपरी ब्रांचचे मुखी रवींद्र मोहिते यांच्या देखरेखीखाली स्थानिक सेवादल अधिकारी व स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली.
संत निरंकारी मिशनच्या डोंबिवली झोन अंतर्गत टिटवाळा येथील विद्या मंदिर शाळेमध्ये आयोजित रक्तदान शिविरात 76 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे रक्तदान केले ज्यामध्ये 68 पुरुष तर 8 महिला रक्तदात्यांचा समावेश होता. जे.जे.महानगर रक्तपेढी मार्फत या शिबिरात रक्त संकलन करण्यात आले.
संत निरंकारी मंडळाचे डोंबिवली क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे कल्याण सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे, शिवसेना उपशहर प्रमुख विजय देशेकर, भाजपा विभाग अध्यक्ष प्रदीप भोईर यांच्या व्यतिरिक्त अनेक स्थानिक प्रबंधकगण आणि सेवादल अधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मिशनच्या मानवतावादी कार्याचे कौतूक केले.
मांडा, टिटवाळा, मोहने, आंबिवली, अटाळी तसेच आसपासच्या भागातील निरंकारी भक्तांनी या शिबिरामध्ये भाग घेतला. स्थानिक मुखी खंडू धादवड यांनी सेवादल सदस्यांच्या सहयोगाने या शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन केले.
.jpg)




Post a Comment
0 Comments