Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

महाराष्ट्राला बळ देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा - प्रमोद हिंदुराव

  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा हा महाराष्ट्राला बळ देणारा

- प्रमोद हिंदुराव


              ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी कल्याणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या जाहीरनाम्यातील प्रमुख बाबींची माहिती माध्यमांना दिली.

या जाहीरनाम्यात लाडकी बहिण योजने अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारी रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. महिला सुरक्षेसाठी पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती, वीज बिलात 30 टक्के कपात करून सौर उर्जेला प्राधान्य देणे, त्याचबरोबर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसांच्या आत नव महाराष्ट्र दृष्टीकोन स्थापन करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याचे काम महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत असल्याचं यावेळी प्रमोद हिंदुराव म्हणाले.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात भाजपचे शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी केलेल्या बंडखोरीवर भाष्य करताना प्रमोद हिंदुराव यांनी म्हटलं की बंडखोरीला कोणी थारा देत नसून पक्ष महत्त्वाचा असतो. महायुतीचे प्रत्येक उमेदवार निवडून येतील असा विश्वासही हिंदुराव यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून व्यक्त केला.


Post a Comment

0 Comments