Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण ग्रामीण विधानसभेत महायुतीच्या राजेश मोरे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 कल्याण ग्रामीण विधानसभेत महायुतीच्या राजेश मोरे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर 

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी, रिपाइं महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या निवडणूक प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये मोरे यांनी गेल्या दोन दिवसांपासून मतदारांच्या वैयक्तीक गाठीभेटीवर भर देण्यात येत असून मतदार पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारलाच पसंती देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.






उमेदवारी जाहीर झाल्यापासून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज मतदारसंघातील रेल्वे समांतर रस्ता कचोरे गाव येथील गावदेवीचे दर्शन घेत आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. वाजत गाजत निघालेल्या या पदयात्रेच्या माध्यमातून या भागातील कशिष गेलेक्सी, पारिजात, हनुमान मंदिर, श्रीकृष्ण नगर, नगरसेविका रेखा चौधरी यांचे जनसंपर्क कार्यालय, लोकग्राम, चक्कीनाका, नगरसेवक मोरेश्वर भोईर यांचे कार्यालय करून पुढे भाल गाव येथील गणेश म्हात्रे यांच्या घराजवळ या पदयात्रेचा समारोप करण्यात आला.

राज्यात असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे महायुतीचे सरकार अत्यंत वेगाने प्रगती करत आहे. आमच्या सरकारने राज्यातील विद्यार्थी, महिला, युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह गोरगरीब जनतेसाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्यामुळे जनता पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारला निवडून देईल असा विश्वास राजेश मोरे यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रचारावेळी महायुती उमेदवार राजेश मोरे यांच्यासह मनोज चौधरी, कविता गावंड, प्रमिला चौधरी, किरण मोंडकर, रश्मी गव्हाणे, राजन चौधरी आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments