Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

महायुतीच्या सुलभा गायकवाड यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

 महायुतीच्या  सुलभा गायकवाड यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

                    ब्लॅक अँड व्हाईट 

(कल्याण)वार्ताहर : कल्याण पूर्व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. त्याच अनुषंगाने कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाच्या महायुती भाजपाच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांच्या प्रचारार्थ कल्याण पूर्वेतील तिसाई हाऊस येथून रमाबाई आंबेडकर चौक, उतेकर सदन, बौद्ध विहार, आनंदवाडी, पुना लिंक रोड, शिवाजी कॉलनी या मार्गावार भव्य प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सुलभा गायकवाड यांना सर्वसामान्य नागरिक आणि मुख्यता महिला वर्गाकडून मिळणारा प्रतिसाद अकल्पनिय आहे.



या प्रचार फेरीला भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, शिवसेना विधानसभा संघटक रमाकांत देवळेकर, उपसंघटक राधिका गुप्ते, माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, महिला मोर्चा आघाडी अध्यक्षा सविता देशमुख, शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक निलेश शिंदे, माजी नगरसेविका संगीता गायकवाड, इंदिरा तरे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि अफाट जनसमुदाय उपस्थित होता.


Post a Comment

0 Comments