Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आगरी समाज स्नेहसंमेलनात’ राजू पाटील यांचा सन्मान

  आगरी समाज स्नेहसंमेलनात              राजू पाटील यांचा सन्मान 

                      ब्लॅक अँड व्हाईट

 (कल्याण ) वार्ताहर : आगरी वधू - वर सामुदायिक विवाह सोहळा समिती  डोंबिवली, डायघर पंचक्रोशी संघर्ष समिती, शेतकरी अन्याय निवारण संघर्ष समिती  सोनारपाडा-दावडी यांनी आयोजन केलेल्या आगरी समाज स्नेह संमेलनात मनसे आमदार तथा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजू पाटील यांचा सन्मान करण्यात आला. 


   कल्याण-डोंबिवलीत भौगोलिक प्ररिस्थीती नुसार अनेक समाज वास्तव्याला आले आणि त्यांचे हसत स्वागत देखील इथल्या भुमिपुत्रांनी केले आहे. आजवर विविध समाजांद्वारे बोलविण्यात येते तिथे सत्कार होतो,  परंतू गुरुवारी पहिल्यांदाच एका लोकप्रतिनिधीला बोलवून त्याचा सत्कार केला अन त्याच्या कामाचे जाहीर कौतुक केले हा मान सुदैवाने समाजाकडून ‘आगरी समाज स्नेहसंमेलनात’ मिळाले अन आगरी समाजाने अजून मला ऋणात ठेवले असल्याची भावना राजू पाटील यांनी व्यक्त केली. तर  माझ्या घरातून मला मिळालेला सन्मान कोणत्याही मोठ्या पुरस्कारा इतकाच मोठा आहे अन तेही समाजाच्या संताकडून ह्याहून वेगळा दुग्दशर्करा योग कोणता ? असे सांगत राजू पाटील यांनी आगरी समाजाचे आभार मानले आहेत.

या सोहळ्याला ठाणे रायगड जिल्हा वारकरी संप्रदाय अध्यक्ष चेतन महाराज म्हात्रें, आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री, भागवताचार्य जयेश महाराज भाग्यवंत, समाज रत्न हनुमान महाराज कोळे, युवा किर्तनकार विनीत महाराज म्हात्रें, २७ गाव संघर्ष समितीचे जेष्ठ नेते गंगाराम  शेलार, अर्जुन बुवा चौधरी, १४ गाव विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, डायघर पंचक्रोशी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष पाटील, आगरी साहित्यिक सर्वेश तरे, आगरी धवलारीन अवनी पाटील,  प्रसिद्ध गायक परमेश माळी, केतन म्हात्रें, भूमिपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील, पंचमहाभूतचे गणेश पाटील यांसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments