Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

संविधान देशाचा श्वास आहे - अधिवक्त्या मंदाकिनी पाटील

 संविधान देशाचा श्वास आहे - अधिवक्त्या मंदाकिनी पाटील

सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या 

वतीने संविधान दिवस साजरा  



                        ब्लॅक अँड व्हाईट/ कुणाल म्हात्रे

 (कल्याण ): स्वातंत्र्य, समता, बंधुता न्याय ही संविधानातील मानवीमूल्य स्वतःत रुजवून देशाच्या सार्वभौमत्वासाठी आपण कटीबद्ध होणे गरजेचे आहे. म्हणूनच भारताचा उत्तम नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्याना १०० मार्कासाठी नागरिकशास्त्र व इयत्ता पाचवीपासूनच कायदा हा विषय अनिवार्य करायला हवा. आपले संविधान आपल्या देशाचा आत्मा व श्वास आहे असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या अभिवक्त्या मंदाकिनी पाटील यांनी सार्वजनिक वाचनालय कल्याण व क.डो.म.पा यांच्या संयुक्त विद्यमाने पु.भा.भावे व्याख्यानमाले अंतर्गत संविधान दिनाच्या कार्यक्रमात केले. प्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

       भारतीय संविधानाचे औचित्य साधून “माझे संविधान-काव्य महोत्सव”आयोजितकरण्यात आले होते. भारतीय संविधान,बीजे रोवली लोकशाहीने, आपले संविधान अशा संविधानाच्या गौरवात्मक कवितेचं सादरीकरण उपस्थित कवींनी केले. प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, उपाध्यक्षा आशा जोशी, सरचिटणीस भिकू बारस्कर, चिटणीस निलिमा नरेगलकर, कार्यकारणी सदस्य अरविंद शिंपी, विजयसिंह परदेशी, कवि दिप जगदेव भटू, ज्येष्ठ कवी राजरत्न राजगुरू, सुधाकर वसईकर, सुधीर चित्ते, सुरेखा गायकवाड, वाचनालयाच्या ग्रंथसेविका, काव्यप्रेमी उपस्थित होते. ज्येष्ठ कवी संदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली “माझे संविधान-काव्य महोत्सव” उत्साहात संपन्न झाला.


Post a Comment

0 Comments