आमदार सुलभा गायकवाड यांच्याकडून आगीत उध्वस्त झालेल्या कुटुंबाला मदत
अग्नी तांडवात उध्वस्त झालेल्या जोशी कुटुंबियांच्या मदतीला धावल्या नवनिर्वाचित आमदार सुलभा गायकवाड
ब्लॅक अँड व्हाईट
(कल्याण) वार्ताहर : कल्याण पूर्व मतदार संघातील माणेरे गाव, जोशी पाडा येथील रहिवाशी रघुनाथ जोशी यांच्या घराला पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली. घरातील सर्व सामान जळून खाक झाले. घरात झोपलेले 27 जण थोडक्यात बचावले. आगीच स्वरूप इतकं भीषण होत की यात त्यांच्या घराचे पूर्णपणे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच नवनिर्वाचित आमदार सुलभा गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पीडित कुटुंबाची विचारपूस केली. त्यांचे झालेले नुकसानाची शासकीय अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून त्यांना लवकरात लवकर शासकीय नुकसान भरपाई मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले.
या दुःखद प्रसंगातून जोशी कुटुंबियांना त्यांचे पुनर्वसनासाठी माझ्याकडून सर्व आवश्यक ती मदत मी सढळ हस्ते करेन असे आश्वासन आमदार सुलभा गायकवाड यांनी पीडित कुटुंबाला दिले. यावेळी माणेरे गावचे विजयी जोशी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments