नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत, वरळीबालदिनानिमित्त बाल-कलाकांरांचे चित्रप्रदर्शन
एस.पी.मेमोरीयल ट्रस्ट, मुंबई द्वारा आयोजित विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी बालदिनाचे औचित्य साधून बाल-चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन नेहरु सेंटर कलादालन,वरळी येथे भरविण्यात आले आहे.
शिवम कुमार-10वी, शुभम मकवाना-10वी, आयुष वर्मा-10वी,चिन्मय चव्हाण-9वी,भक्ती प्रविण मोरे-8वी आरूशी सिंग-7वी, स्मितेश आनंदकिशोर मेहर-6वी या बाल-कलाकारां बरोबरच मुंबई, कल्याण, औरंगाबाद विभागातून साधारणपणे 300 चित्राकृती प्रदर्शित करण्यात आले आहे.ट्रस्ट तर्फे विद्यार्थ्यांना प्रेरीत करण्यासाठी मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना कला आणि अभ्यासासाठी प्रेरीत करणारी संस्था "कलाआनंद फाऊंडेशन" श्री आनंदकिशोर मेहर सर, प्रविण मोरे सर, ललिता चव्हाण यांचे ही सहकार्य लाभले.सर्वांनी आवर्जून चित्रप्रदर्शनाला भेट देऊन बालकलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांद्वारे करण्यात आले आहे.
चित्रप्रदर्शन 12 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर, सकाळी 11ते सायंकाळी 7वाजे पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा डॉ.मधूश्री गोले, प्रमुख पाहुणे द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया चे सचिव मा. श्री दिपक निफाडे , मा.श्री किशोर नादावडेकर ( आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व अनेक पारितोषिकं विजेते)मा.श्री.महादेव गोपाळे(जागतिक कीर्तीचे रांगोळीकार व चित्रकार), चित्रकार व माजी कलाशिक्षक सौ.आशा कारेकर, संस्थेचे सचिव माजी कलाशिक्षक व प्राध्यापक मा.श्री.अरविंद सावंत सर पालक इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित दिपप्रज्वलन,प्रेरणादायी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना व पालकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
.jpg)

Post a Comment
0 Comments