Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शहापुरात विद्यमान आमदार दौलत दरोडा यांचा ऐतिहासिक विजय

 शहापुरात  दौलत दरोडा यांचा   ऐतिहासिक विजय

                         ब्लॅक अँड व्हाईट 

 (शहापूर ) प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दौलत दरोडा साहेब यांनी शहापूर विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे .या निवडणुकीत एकूण 24 फेऱ्या झाल्या ,आणि प्रत्येक फेरीत त्याने आपली आघाडी कायम राखली .खरंतर शहापूर विधानसभा निवडणुकीत एकूण नऊ उमेदवारांपैकी तिरंगी लढतच पाहायला मिळाली .पहिल्या फेरीपासूनच दौलत दरोडा यांची जोरदार लीड सुरू होती .जे शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली .शेवटच्या फेरीत दरोडा यांनी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांना चारही मुंड्या चीत करीत 1672 चा लीड घेऊन विजयश्री खेचून आणली .त्यापैकी 72775 मते दौलत दरोडा यांना मिळाली .तर 70736 मते पांडुरंग बरोरा व जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार रंजनाताई उघडा यांना 42508 मतांवर समाधान मानावे लागले .

ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजी करत दरोडा यांच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी विजय जल्लोष करीत दौलत दरोडा यांची त्यांच्या निवासस्थानापासून ते जोंधळे कॉलेजपर्यंत मिरवणूक काढली .

Post a Comment

0 Comments