Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डॉ आर बी सिंह यांचे दुःखद निधन

       डॉ आर बी सिंह यांचे दुःखद निधन

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ चे सरचिटणीस व कर्मचाऱ्यांचे आराध्य दैवत व खंबीर नेत्रुत्व डॉ आर बी सिंह यांचे दुःखद निधन 


ब्लॅक अँड व्हाईट/ कल्याण वार्ताहर 

अखिल भारतीय महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ चे सरचिटणीस  व अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघ चे अध्यक्ष व धडाडी चे नेत्रुत्व तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आराध्य दैवत ,भाग्यविधाते पित्रुतुल्य डॉ आर बी सिंह यांचे आजारपणामुळे फोर्टिज हॉस्पिटल कल्याण येथे उपचारा दरम्यान मंगळवार दिनांक 5/11/2024 रोजी दुःखद निधन झाले या धक्कादायक बातमी मुळे शिक्षकेतर कर्मचारी परिवाराचा आधार स्तंभ हरपला या भावनेने सर्वत्र शोककळा पसरली होती .शिक्षकेतर कर्मचारी परिवार साठी दुर्दैवी व दुःखद बातमी काळा दिवस व मनाला चटका लावणारी होती .कै डॉ आर बी सिंह यांनी राज्यव्यापी व देशव्यापी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अनेक वर्षे त्यांच्या न्याय्य व रास्त मागण्यांसाठी शासन दरबारी प्रलंबित असलेल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी संप ,मोर्चे ,साखळी उपोषणे ,धरणे ,आमरण उपोषणे व रास्ता रोको आणि जेल भरो सारखे आंदोलने राबवून व तसेच वेळोवेळी शासनाशी चर्चा घडवून शिक्षकेतर कर्मचाऱ्याना हक्काचा न्याय मिळवून दिलेला आहे .त्यांचे खंबीर व धडाडी चे नेत्रुत्वा पासून शिक्षकेतर कर्मचारी वर्ग पोरका झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .डॉ आर बी सिंह यांच्या निधनामुळे कधीही न  भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे .त्यांच्या धडाडीच्या व खंबीर नेत्रुत्वास त्रिवार सलाम .डॉ आर बी सिंह यांच्या पवित्र पार्थिवावर कल्याण पश्चिम  येथील प्रेम आटो जवळ असलेल्या स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्या प्रसंगी शिक्षकेतर कर्मचारी परिवार , मित्र परिवार व अन्य स्नेही ,नातेवाईक मंडळी इत्यादी उपस्थितांनी दुःखद नयनानि  व त्याना भावपूर्ण व आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आत्म्यास शांती व सदगति लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून  अखेरचं निरोप दिला ,.

Post a Comment

0 Comments