सुलभा गायकवाड यांच्या प्रचारासाठी भोजपुरी अभिनेते रवी किशन यांची भव्य रॅली
"माझ्या लाडक्या सुलभाताईला प्रचंड बहुमताने विजयी करा हे माझ्या समाज बांधवांना सांगण्यासाठी मी सतराशे किलोमीटर लांबून इथे आलो आहे" ............ लोकसभा सदस्य /अभिनेते रवी किशन
आज कल्याण पूर्वेत माननीय खासदार श्री रवी किशन जी यांचा भव्यदिव्य प्रचार फेरीचे १४२ कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ सुलभा गणपत गायकवाड यांच्या प्रचारार्थ आयोजन करण्यात आले होते. प्रचार फेरीची सुरवात अवध रामलीला समिती येथून म्हात्रे नाका, काटेमानिवली नाका, नाना पावशे चौक, जनता बँक, काली माता मंदिर येथे समारोप करण्यात आली. या फेरीची माननीय खासदार रवी किशनजी यांनी आपल्या भोजपुरी शैलीत सर्व उत्तर भारतीय समाज बांधवांना सौ सुलभाताईंना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.
आम्ही सरकार स्थापन करत आहोत आणि येत्या २३ तारखेला महायुती सरकार शपथ घेणार आहे. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नसावी असे आपल्या भोजपुरी अंदाजात सांगितले. या प्रचार फेरीला प्रचंड जनसमुदाय लोटला होता. मी माझ्या लाडकी बहीण सुलभाताई यांच्यासाठी १७०० किलो मिटर लांबून फक्त तुम्हा सगळ्यांना भेटायला आलो आहे माझ्या सर्व उत्तर भारतीय बांधवांना आणि माझ्या फॅन्सना आवाहन करतो की माझ्या सुलभाताईला प्रचंड बहुमतांनी आपण सर्व निवडून द्याल याची मला खात्री आहे.यावेळी माननीय खासदार रवी किशन यांच्या सोबत सौ सुलभाताई गणपत गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष उत्तर भारतीय मोर्चा नागेंद्र फौजदार शर्मा, जिल्हा सरचिटणीस मनोज राय,उत्तर भारतीय आघाडी कल्याण जिल्हा उपाध्यक्ष लल्लन कनोजिया, जिल्हा कार्यकारणी सदस्य विजय उपाध्याय, उत्तर भारतीय मोर्चा कल्याण अध्यक्ष सत्यप्रकाश उपाध्याय, महासचिव अविनाश सिहं, अभिषेक तिवारी, शशी तिवारी, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, महिला आघाडी सरचिटणीस निशा सिंग, मा नगरसेविका हेमलता पावशे,वरिष्ठ सल्लागार प्रशांत राय, रामजीत सिंग, डॉ पोटदुखे,कैलास पावशे, ॲड सत्येंद्र दुबे, मृत्युंजय शुक्ला, दीपक गुप्ता, संजय तिवारी, सौरभ सिंग, अमिताभ सिंग तसेच इतर मान्यवार उत्तर भारतीय मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
.jpg)



Post a Comment
0 Comments