Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवलीतून उमेदवार दिपेश म्हात्रे यांना जोरदार पाठिंबा

 डोंबिवलीत दीपेश म्हात्रे यांच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली 

डोंबिवलीतून उमेदवार दिपेश म्हात्रे यांना जोरदार पाठिंबा

                             ब्लॅक अँड व्हाईट 

( डोंबिवली ) वार्ताहर : डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानात भव्य प्रचारसभा आयोजित करण्यात आली. या सभेत पक्षाचे अधिकृत उमेदवार, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत विधानसभेचे उमेदवार श्री दिपेश म्हात्रे यांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांचा अभूतपूर्व जनसागर उसळला होता.मा. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या सभेत प्रभावी भाषण केले. त्यांनी भाजपवर जोरदार टीका करत, डोंबिवलीच्या प्रगतीसाठी सक्षम नेतृत्व निवडण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

"भाजपचा आजचा संकरित चेहरा निष्ठा आणि स्वाभिमान गमावून बसला आहे. लोकांच्या घरांमध्ये फूट पाडणाऱ्या भाजपला विकासापेक्षा स्वतःच्या फायद्याचा विचार अधिक महत्त्वाचा आहे. आमचे हिंदुत्व हे रोजगार देणारे आहे; भाजपचे हिंदुत्व फक्त समाजामध्ये भिंती उभ्या करणारे आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान देत, "जर मर्दाची औलाद असाल तर तुमच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणुकीला सामोरे जा," असे विधान केले.

"पैशांचा महापूर आला तरी रस्ते सुधारले नाहीत, प्राथमिक सुविधा दिल्या नाहीत. विकासाच्या नावाखाली ठेकेदारांच्या खिशात पैसा जात आहे," अशी टीका त्यांनी भाजप सरकारवर केली. “आत्ताचा भाजप हा संकरित भाजप झाला आहे. त्यांना निष्ठा आणि स्वाभिमान नावाचा प्रकार उरलेला नाही. लोकांची घरं फोडणाऱ्या भाजपच्या राज्यात इतर पक्षांनाही बिझी ठेवले जाते," अशी टीका त्यांनी केली."भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणतात, 'आम्हाला संघाची गरज नाही.' संघाने अनेक कार्यकर्त्यांनी घरदार सोडून भाजप उभा केला, अविवाहित राहून पक्ष वाढवला, पण आता भाजपने त्यांनाच दूर केले आहे. नड्डांच्या अशा वक्तव्याने कार्यकर्त्यांचा अपमान केला गेला आहे,"

"डोंबिवलीतील प्रत्येक मतदाराला परिवर्तनाची गरज आहे, आणि ते परिवर्तन शिवसेना आणणार आहे," असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.सभेत उपस्थित, शिवसेनेचे उमेदवार श्री दिपेश पंडित म्हात्रे यांनी देखील आपल्या आगामी योजनांवर प्रकाश टाकला.

"ही निवडणूक सोपी नाही. भाजपकडून विविध प्रकारचे दबाव येत आहेत – कधी परवानगी रोखणे, कधी गुन्हे दाखल करणे. पण उद्धव साहेबांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि डोंबिवलीकरांनी दिलेला पाठिंबा माझ्यासाठी प्रेरणादायक आहे. कितीही अडथळे आले तरी आम्ही डोंबिवलीचा विकास थांबू देणार नाही," असे म्हात्रे म्हणाले.डोंबिवलीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार श्री दिपेश म्हात्रे यांनी भविष्यातील योजना स्पष्ट करताना सांगितले,

"डोंबिवलीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिझनेस सेंटर आणि इन्क्युबेशन सेंटर उभारण्याची आमची योजना आहे. डोंबिवलीतील उपलब्ध रेल्वेच्या ३०० एकर जमिनीचा योग्य वापर करून १ लाखांहून अधिक रोजगार संधी निर्माण करता येतील. या योजनेवर आम्ही सखोल संशोधन केले आहे."

तसेच, श्री म्हात्रे यांनी ५०० चौरस फूटांपर्यंतच्या घरांसाठी नवी मुंबई आणि मुंबई सारखी डोंबिवलीतही ही मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिले. "मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे धोरण नक्कीच अंमलात आणले जाईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सभेसाठी शिवसेनेचे अनेक नेते, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंचावर शिवसेनेचे उमेदवार दीपेश म्हात्रे, सुभाष भोईर, माजी खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, तात्या माने, महिला संघटिका वैशाली दरेकर, माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, संतोष जाधव, प्रकाश वाणी यांच्यासह काँग्रेसचे संतोष केणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वंडार पाटील, रश्मी ठाकरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments