ग्राहकाच्या जीवाशी खेळ कल्याणमधील प्रसिद्ध हॉटेलच्या पावभाजीत आढळला लाेखंडी तुकडा
दिवाळीचे दिवस असल्यानं हॉटेलमध्येही मोठी गर्दी आहे. दिवाळीनिमित्त एकत्र आलेली मंडळी सहकुटुंब, सहपरिवार हॉटेलमध्ये गर्दी करत आहे. पावभाजी हा तर मुंबईकरांचा आवडीचा पदार्थ.
उल्हासनगरमधील सी ब्लाॅक परिसरात राहणारे सुबाेध गवळी त्यांची पत्नी आणि दाेन मुलींसह कल्याणमधील प्रसिद्ध रामदेव हॉटेलमध्ये शुक्रवारी संध्याकाळी नाश्ता करण्यासाठी गेले होते. सुबाेध गवळी यांनी त्यांच्यासाठी पावभाजी आणि दूधाची ऑर्डर दिली. थाेड्याच वेळात त्यांच्या टेबलावर पावभाजी आली. आठ वर्षाच्या मुलीने पावभाजी खाण्यास सुरुवात केली की, तिच्या दाताखाली काही जड वस्तू आली. तिने ती गिळण्याआधीच ताेंडाबाहेर काढली. ती जड वस्तू पाहून तिच्या आईला आणि वडिलांना धक्काच बसला.त्यांना ती वस्तू खडा असेल असं वाटलं होतं. पण पाण्याने धुतल्यावर ताे लाेखंडाचा तुकडा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर संबंधित कुटुंबियांनी हाॅटेल व्यवस्थापकाना याची माहिती दिली. त्यांनी त्यांची चूक मान्य करण्याऐवजी गवळी कुटुंबाला उलट सुलट उत्तरे देत उद्धटपणा केली. सुबाेध गवळी यांनी लगेचच महात्मा फुले पाेलिस स्टेशनमध्ये पाेहचले. त्यांनी पोलिसांकडं या प्रकरणाची तक्रार दिली.
या प्रकरणी महात्मा फुले पाेलिल ठाण्याचे सहाय्यक पाेलीस निरीक्षक स्वप्नील भूजबळ यांनी सांगितले की, ' पाेलिसांनी हाॅटेलात जाऊन सीसीटीव्ही फूटेज चेक केले आहे. त्यानंतर संबंधित ग्राहकाची तक्रार दाखल करुन घेतली आहे. याप्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाईल. हा प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे. पावभाजी तयार करताना हाॅटेलने निष्काळजीपणा आणि ग्राहकाशी उद्धटपणा केल्याबद्दल हॉटेल व्यवस्थापकावर पोलीस काय कारवाई करणार याकडं लक्ष लागलं आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments