Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

लाडक्या बहिणींसाठी दहा वेळा जेलमध्ये जायला तयार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 लाडक्या बहिणींसाठी दहा वेळा जेलमध्ये जायला तयार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या 

हस्ते उद्घाटन 


                ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर  

लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी महाविकास आघाडी दोनदा न्यायालयात गेली असून न्यायलयाने त्यांना फटकारले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास या योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना जेल मध्ये टाकण्याची भाषा महाविकास आघाडीचे नेते करत असून लाडकी बहिण योजना सुरू राहण्यासाठी एका वेळा काय दहा वेळा जेल मध्ये जाण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. 

     सावत्र भाऊ दुष्ट भाऊ विरोधासाठी एकत्र आले आहेत त्यांना जागा दाखवायची वेळ आली आहे. दिवाळीचे फटाके सर्वत्र फुटत आहेत, या निवडणुकीत आपल्याला ॲटम बॉम्ब फोडायचे आहेत विरोधकांच्या खुर्ची खाली फटाके फुटायला लागल्या असून आताच छोट्या मोठ्या लवांग्या फुटायला लागल्या आहेत असा ही टोला नाव न घेता विरोधकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणात लगावला.

तुमच्या आघाडी सरकारने अडीच वर्षांत काय केले? आणि महायुती सरकारने दोन वर्षांत काय केले हे होऊन जाऊ द्या दूध का दूध पानी का पानी, आम्ही हिशोब द्यायला तयार असून तुम्ही काय केले ते सांगा अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला खुले आव्हान दिले. आमचे सरकार हे देना बँक आहे लेना बँक नाही. हे तुमच्या खात्यामध्ये 5 हफ्ते भरणारे सरकार आहे. पूर्वीचे सरकार हे हफ्ते घेणारे होते. त्यामुळेच त्यांचे मंत्री, अधिकारी जेलमध्ये गेले. पण आमचे सरकार हे तुमच्या खात्यामध्ये हफ्ते भरणारे सरकार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान  या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे प्रमुख नेते, शेकडो समर्थक आणि हजारो लाडक्या बहिणी उपस्थित असल्याने प्रचंड मोठी गर्दी झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमस्थळी दाखल झाल्यावर स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस प्रशासन आणि त्यांचे सुरक्षारक्षक यांची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले. 

 


Post a Comment

0 Comments