Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आंबेडकरी विचारांची एक जूट महायुतीची वज्रमूठ

आंबेडकरी विचारांची एक जूट   महायुतीची वज्रमूठ




                  ब्लॅक अँड व्हाईट/डोंबिवली प्रतिनिधी

रविवारी दिनांक 10 2024 रोजी डोंबिवलीतील ठाकूर हॉल येथे रिपब्लिकन आठवले गट ठाणे प्रदेशच्या वतीने माणिकराव उघडे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे लाडके उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्या समर्थनार्थ आंबेडकरी जनतेचा भव्य असा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती जास्त होती.यावेळी उपस्थित बांधकाम मंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित सर्व जनतेचे आभार मानले.होणाऱ्या निवडणुकीत आपल्या सर्वांची एकजूट ही देशासाठी  अत्यंत आवश्यक असून ,देशातील सर्व गोरगरीब जनतेचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ही एकजूट महत्वाची आहे.असे सांगून, ह्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास बोलून दाखवला.येणाऱ्या कालावधीत उपस्थितांचे प्रश्न प्रामुख्याने सोडविण्याचे आश्वासन दिले.राष्ट्रीय सचिव सुरेश दादा बार्शी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, मीनाताई साळवे, कल्याण डोंबिवली जिल्हाअध्यक्षा, महिला आघाडी शहर अध्यक्षा रिपाई नेत्या प्रमिलाताई सावंत,प्रमिलाताई वाहुळे, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव मिसाळ, महेश पाटील शिवसेना नेते. कार्यक्रमाचे आयोजक विकास खैरनार,संजय पवार, अशोक हिवाळे, शिवाजीराव वाटुरे, लक्ष्मण उशिरे, भीमराव पाटेकर,समाधान तायडे, धम्मपाल सरकटे, वसंत टेकाळे, सुभाष अंभोरे, मंगेश कांबळे, शिवा पवार, विजय शेळके, सुनिता खरात, माया मोरे, मीना गोरे ,काशीबाई वाटुरे,आणि किशोर मगरे,जय प्रल्हाद जाधव असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments