सुलभा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस कल्याण पूर्वेत
महायुतीच्या वतीने मोठे शक्तिप्रदर्शन
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी कल्याण पूर्वेत उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पार्टीने कल्याण पूर्वेतून महायुतीच्या उमेदवार म्हणून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कल्याण पूर्वेतील आमदार कार्यलय तिसाई हाऊस येथून महायुतीच्या वतीने मोठे शक्ती प्रदर्शन करत ड प्रभाग क्षेत्र कार्यालय येथील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.
यावेळी महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड, भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, माजी नगरसेवक अभिमन्यु गायकवाड, मनोज राय, रेखा चौधरी, कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीकडून उद्या फॉर्म भरायला जाणार असून, जी काही शक्ति असेल ते महायुतीची शक्ति असेल. याठिकाणी दुसरं कोणाचंही आवाहन नसल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कॉँग्रेस, आरपीआय तसेच इतर घटक पक्षातील सर्वांच्या उपस्थितीत ड प्रभाग क्षेत्र कार्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे नरेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.
.jpg)
.jpeg)
.jpeg)
Post a Comment
0 Comments