Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जिल्हामहामंत्री ठाणे ग्रामीणपदी. संभाजी शिंदे

 जिल्हामहामंत्री ठाणे ग्रामीणपदी.  संभाजी शिंदे

     ब्लॅक अँड व्हाईट / बदलापूर वार्ताहर 

 विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांतून जोरदार तयारी सुरू आहे. या अनुषंगाने ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजपला चांगले यश मिळावे, तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचता यावे, यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांच्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हा महामंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे.

माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी बदलापूर शहरात एक सक्षम भाजपचा पदाधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना नवी जबाबदारी सोपविण्याचा विचार केला होता. चार दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित बैठकीत पक्षस्तरावर काही महत्त्वाची पदे घोषित केली. यातच ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हा महामंत्री या पदावर संभाजी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संभाजी शिंदे यांना देण्यात आले. संभाजी शिंदे यांच्या अभ्यासूवृत्तीचा पक्षाला असाच फायदा होईल, असा विश्वास यावेळी पक्ष वरिष्ठांनी संभाजी शिंदे यांच्यावर दाखवला आहे. पक्षाने दाखवलेला विश्वास आणि यापूर्वी झालेल्या निवडणुकांचा केलेला अभ्यास हा जिल्हा महामंत्रिपदासाठी कामी येईल, असे मत संभाजी शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments