केडीएमसीच्या वतीने "स्वच्छ दिपावली शुभ दिपावली" उपक्रमा अंतर्गत सर्वकष स्वच्छता मोहीम
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत "स्वच्छ दिपावली शुभ दिपावली" उपक्रमा अन्वये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. इंदू राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वंकष स्वच्छता मोहीम नुकतीच कल्याण स्टेशन परिसर येथे रात्री १० ते पहाटे ६ वाजे पर्यंत राबविण्यात आले. या कार्यकमावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इंदू राणी जाखड तसेच उप आयुक्त (घ.क.व्य) अतुल पाटील, सहाय्यक आयुक्त प्रिती गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी (स्मार्टसिटी) प्रल्हाद रोडे, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे व संबंधित स्टाफ, तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील नागरीक वर्ग उपस्थित होता.
.jpg)



Post a Comment
0 Comments