कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक रिंगणात 14 उमेदवार वैध
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया बुधवारी (दि.23) सकाळी सुरू करण्यात आली. या छाननी प्रक्रियेत नामनिर्देशनपत्र दाखल केलेले सर्व 14 उमेदवार वैध ठरले आहेत.
कल्याण विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी दुपारी 3 वाजता संपली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेर या मतदारसंघात एकूण 14 उमेदवारांनी 18 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. या सर्व नामनिर्देशन अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी बुधवारी (दि.23) उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या समोर केली. याप्रसंगी मतदारसंघाचे केंद्रीय सर्वसाधारण निरीक्षक पुरुषोत्तम कुमार उपस्थित होते. नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांना सोमवारी दि. 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.
144 - कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात वैध ठरलेले उमेदवार असे...
प्रमोद उर्फ राजू रतन पाटील - महाराष्ट्र नवनिर्माण सेना
दीपक दत्ता खंदारे - बहुजन समाज पार्टी
सुभाष गणू भोईर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
राजेश गोवर्धन मोरे - शिवसेना
उज्वला गौतम जगताप - भारतीय जनविकास आघाडी
विकास प्रकाश इंगळे - वंचित बहुजन आघाडी
हबीबुर्रहमान ओबेदुर्रहमान खान - पीस पार्टी
शिवा कृष्णमूर्ती अय्यर - अपक्ष
नरसिंग दत्तू गायसमुद्रे - अपक्ष
प्रियांका गजानन मयेकर - अपक्ष
दिपक रामकिसन भालेराव - अपक्ष
परेश प्रकाश बडवे - अपक्ष
चंद्रकांत रंभाजी मोटे - अपक्ष
अश्विनी अशोक गंगावणे - अपक्ष
.jpg)

Post a Comment
0 Comments