कल्याण पश्चिमेमध्ये महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या काळातील सरकारच्या आणि सध्याच्या महायुतीच्या सरकारच्या विकासाच्या आलेखाचं सादरीकरण करण्यात आलं. उद्धव ठाकरे सरकारपेक्षा महायुती सरकारने महाराष्ट्रात भरघोस निधी देऊन महाराष्ट्राचा विकास केल्याची माहिती यावेळी महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आली.
कल्याण पश्चिमेत महायुतीची पत्रकार
परिषद
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
यावेळी पत्रकार परिषदेस आमदार विश्वनाथ भोईर, भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, भाजपा कल्याण पश्चिम मंडल अध्यक्ष वरुण पाटील, माजी नगरसेवक प्रभूनाथ भोईर, मोहन उगले, श्रेयस समेळ, जयवंत भोईर, परिवहन समिती सदस्य सुनील खारुक, महिला शहर संघटक नेत्रा उगले आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेच्या मंचावर कल्याण पश्चिमेचे शिवसेना शिंदे गटाचे सध्याचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर आणि याच मतदारसंघात महायुतीच्या भाजप, शिवसेना शिंदे गटातील इच्छुक असलेले उमेदवार एकाच मंचावर होते. त्यामुळे हे उमेदवार एकमेकांबरोबर बोलतात का यावर सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. या मतदारसंघात महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळेल हे प्रत्येक पक्ष ठरवेल असं सांगत विद्यमान आमदार आणि इच्छुक उमेदवारांनी या चर्चेवर पडदा टाकला.
याबाबत आमदार विश्वनाथ भोईर यांना विचारले असता, महायुतीमध्ये कोणालाही उमेदवारी भेटल्यास आम्ही काम करणार असून, एकनाथ शिंदे सांगतील त्याच काम करणार आहोत. तर कुठल्याही व्यक्तीने इच्छुक असणे यात काही गैर नाही. जो कार्यकर्ता काम करतो त्याला लोकप्रतिनिधी व्हावं असं वाटत असतं. आता देखील विधानसभेच्या निवडणुका असून आमदारकीसाठी जे इच्छुक आहेत त्यांनी पक्षाकडे मागणी केली आहे, यात काही गैर नसल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.
.jpg)
.jpeg)
.jpeg)
Post a Comment
0 Comments