Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण स्टेशन परिसरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

               कल्याण स्टेशन परिसरातील

        रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास                   


            ब्लॅक अँड व्हाईट /कल्याण वार्ताहर 


कल्याण स्टेशन नजीक असलेल्या रस्त्याचे फुटपाथ सोमवारी फेरीवाले, ठेलेवाले यांच्या विळख्यात नसल्याने या फुटपाथांनी मोकळा श्वास घेतल्याचे सुखद दृश्य दिसत होते.            

कल्याण स्टेशन नजीक परिसरातील दिपक हाँटेल ते महंमद अल्ली चौक, महंमद अल्ली चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यांचे फुटपाथ फेरीवाले, ठेलेवाले, हातगाडी वर विक्री करणार्या च्या विळख्यात असल्याने सर्वसामान्यना फुटपाथवरून चालताना मोठी कसरत करीत वाटचाल करीत मार्ग क्रमण करावे लागते. नेहमीच रहदारी असलेल्या या परिसरात फुटपाथवर अतिक्रमण करून फेरीवाले, ठेलेवाले आपल्या मालाची विक्री करतात. महानगरपालिका फेरीवाला पथक गस्त घालून कारवाई करते, पंरतु फेरीवाले पथकांची पाठ फिरताच परिस्थिती जैसे थे अशी दिसते.

 न्यायालयाचे स्टेशन परिसरातील रस्त्याच्या फुटपाथवरील फेरीवाले, ठेलेवाले हाटविण्याचे आदेश असून मनपा फेरीवाला पथक कारवाईचा बडगा उगारते. हाच भाग आज स्टेशन परिसरातील दिपक हाँटेल, ते महंमद अल्ली चौक, महमंद अल्ली चौक ते छत्रपती शिवाजीमहाराज चौक परिसरातील रस्त्याच्या फुटपाथवरील,फेरीवाले, ठेलेवाले दिसत नसल्याने फुटपाथांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसत होते.   

  यासंदर्भात क प्रभाग सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता संदर्भीत परिसरात फेरीवाला पथका मार्फत कारवाई सुरू असून कारवाईचा बडगा सुरु राहणार असल्याचे सांगितले. विजय अमुप या नागरिकांने सांगितले की,फुटपाथ मोकळे असल्याने अडथळ्यांची शर्यत पार करीत चालणे यानिमित्ताने टळले आहे.


Tags

Post a Comment

0 Comments