शहापुरच्या आदिवासी भागात
138 निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने डोंबिवली झोन अंतर्गत शहापूर, कसारा आणि वासिंद या तीन ब्रांचतर्फे रविवारी संत निरंकारी सत्संग भवन, गोठेघर, शहापूर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 138 निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. त्यामध्ये 114 पुरुष तर 24 महिला रक्तदात्यांचा समावेश होता. संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्ले, मुंबई यांनी यावेळी रक्त संकलन केले.
निरंकारी सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांची ‘नर सेवा, नारायण पूजा’ ची शिकवण आत्मसात करत निरंकारी भक्त रक्तदानासह विविध सामाजिक सेवांमध्ये साततने आपले योगदान देत आहेत. याचाच परिणाम म्हणून शहापुर, कसारा व वासिंद सारख्या आदिवासी भागातदेखील निरंकारी भक्तगणांनी रक्तदानासाठी दर्शविलेला उत्साह निश्चितच कौतुकास्पद आहे.
संत निरंकारी मंडळाचे डोंबिवली क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्या उपस्थितीत नामस्मरण करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सेवादल क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रे, कल्याणचे सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे यांच्यासह शहापूर, वासिंद आणि कसारा शाखांचे मुखी अनुक्रमे शैलेश सपकाळे, नितीन ढगे आणि शांताराम ठवले आदि प्रबंधकगण व सेवादल अधिकारी उपस्थित होते.
या शिबिराला स्थानिक आमदार दौलत दरोडा, गोठेघर ग्रामपंचायतचे सरपंच गणेश कामडी, उपसरपंच महेंद्र डिंगोरे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी निरंकारी मिशनच्या मानवतावादी सामाजिक कार्याचे कौतुक केले. मिशनच्या या रक्तदान शिबिराने प्रेरित होत मान्यवर म्हणून उपस्थित असलेल्या सरपंच आणि उपसरपंच यांनी देखील रक्तदान केले.
शहापूर, कसारा, वासिंद तसेच आजूबाजूच्या परिसरातील निरंकारी भक्तगणांनी मोठ्या उत्साहाने या शिबिरात भाग घेतला. स्थानिक मुखींच्या मार्गदर्शनाखाली सेवादल सदस्यांनी शिबिराच्या आयोजनामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले.
.jpg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
Post a Comment
0 Comments