ज्येष्ठ नागरीक दिन" व कल्याण डोंबिवली महानगरपालिका वर्धापन दिनिमित्त महापालिकेची सांस्कृतिक मेजवानी 
१ऑक्टोबर २०२४ रोजी महानगरपालिकेचा ४१ वा वर्धापन दिन आहे. त्याचप्रमाणे या दिवशी ज्येष्ठ नागरीक दिनही साजरा केला जातो. या दोन्ही गोष्टींचे औचित्य साधून महानगरपालिकेने दि. १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यामध्ये १ ऑक्टोबर रोजी "स्वच्छता ही सेवा" या उपक्रमाअंतर्गत प्र.के.आचार्य अत्रे रंगमंदिरात सकाळी १०.३० वाजता महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांसाठी मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात सफाई कर्मचा-यांमार्फत देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये सफाई कर्मचा-यांकरीता आर्थिक साक्षरतेचे सत्र आयोजित करण्यात आले असून, यामध्ये सदर कर्मचा-यांना तज्ञ व्यक्तीमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
महापालिका क्षेत्रात स्वच्छतेविषयक जागरुकता वाढविणे, वातावरणीय बदल व पर्यावरणीय समस्यांबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत आयोजिलेल्या "कचरामुक्त तारांकित सोसायटी" स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा २ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता प्र.के.आचार्य अत्रे रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे. यावेळी महापालिकेमार्फत घेण्यात आलेल्या "स्वच्छ आणि पर्यावरणपुरक शासकिय कार्यालय' या स्पर्धे अंतर्गत ३ महापालिका प्रभाग व ५ शासकिय कार्यालये यांना देखील पारितोषिके देवून सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणा-या विविध सामाजिक संस्था यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे.
३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० पासून महापालिका वर्धापन दिनानिमित्त प्र.के.आचार्य अत्रे रंगमंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
४ व ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० पासून प्र.के.आचार्य अत्रे रंगमंदिरात ज्येष्ठ नागरीकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून, यामध्ये ज्येष्ठांसाठी मनकिर्तन, ज्येष्ठांसाठी आणि ज्येष्ठांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान इत्यादी कार्यक्रमांचा अंतर्भाव असून, ज्येष्ठ नागरीकांना तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनही लाभणार आहे.
.jpg)
Post a Comment
0 Comments