Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जागतिक श्वान दंश दिन निमित्त चर्चासत्र/सभेचे आयोजन.*

 जागतिक श्वान दंश दिन निमित्त   चर्चासत्र/सभेचे आयोजन

          दिनांक 28/09/2024 हा जागतिक दंश दिन म्हणुन जगात साजरा करण्यात येतो. यानिमित्त आज शनिवारी सकाळी डोंबिवलीच्या  गणेश मंदिर मधील वक्रतूंड सभागृहात चर्चासत्र/सभेचे आयोजन रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन तर्फे करण्यात आले होते. यावेळी मुख्य अतिथी म्हणुन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. दिपा शुक्ल या उपस्थित होत्या. 


               ब्लॅक अँड व्हाईट/डोंबिवली वार्ताहर 

        सदर चर्चासत्राला प्राणी मित्र, रोटरीयन, शाळा/कॉलेज विद्यार्थी, शिक्षक वर्ग इत्यादी उपस्थित होते. या चर्चासत्रात सुरवातीला प्राणी मित्र, काही विद्यार्थी यांनी आपले विचार मांडले. रोटरी क्लबचे प्रकल्प प्रमुख डॉ. मनोहर अकोले यांनी जागतिक श्वान दंश दिन आयोजित करण्याच्या उद्देश सांगितला. गेली तेरा वर्ष हा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन यांच्या माध्यमातून करीत आहोत असे त्यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने रॅबीज रोगाचे उच्चाटन 2030 साल पर्यंत करण्याचे ठरविल्याने आम्ही आपल्या सर्वांच्या मदतीने याची जनजागृती करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दिनांक 13/09/2024 ते 19/09/2024 या मुदतीत डोंबिवलीच्या विविध परिसरात श्वान दंश प्रतिबंधित लसीकरण करण्यात आले. यावेळी 1648 भटके कुत्रे आणि 112 मांजरी असे एकूण 1760 लसीकरण करण्यात आले. तसेच प्राणी मित्र, श्वान प्रेमी यांच्या मदतीने निबीॅजीकरण, उपचार -निगा, अन्नपाणी, निवारा इत्यादी सोयी या भटक्या कुत्र्यांच्या साठी केल्याने हे भटके कुत्रे शांत राहत असून त्यामुळे श्वान दंशाचे प्रमाण कमी होते. भारत हा रॅबीज रोगाच्या बाबतीत जगात दुसर्‍या आणि आशिया मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. कल्याण डोंबिवलीत प्राण्यांसाठी अद्यावत रुग्णालय, मृत प्राण्यांसाठी शवागर-स्मशानभूमी, डोंबिवलीसाठी स्वतंत्र निबीॅजीकरण केंद्र, पाळीव श्वान धारकांना परवाना पद्धत सुरू करणे इत्यादी मागण्या डॉ  मनोहर अकोले यांनी आपल्या भाषणात केल्या. डॉ. दिपा शुक्ल यांनी आपल्या भाषणात या कार्यक्रमाची स्तुती करून कल्याण डोंबिवली महापालिका यासाठी आपल्याला सहकार्य करेल तसेच आपल्या योग्य मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करू असे सांगितले. 



         याप्रसंगी रोटरीचे प्रांतपाल श्री हर्ष मकोल, माजी अध्यक्ष श्री. अजय  कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख डॉ मनोहर अकोले हे उपस्थित होत़े. सूत्रसंचालन  डॉ. मकरंद गणपुले यांनी केले. आभार प्रदर्शन श्री अनिल हिरावत यांनी करून शेवटी पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

:- रॅलीचा कार्यक्रम हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. यानिमित्त आणलेले जनजागृतीचे फलक सभेत दाखविण्यात आले.

Post a Comment

0 Comments