डोंबिवलीतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात रवाना
युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी दाखविला झेंडा
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे मोफत बस सोडण्यात आल्या असून डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव चौक येथून देखील चाकरमानी कोकणात रवाना झाले आहेत. या प्रवाशांना कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे शुभेच्छा दिल्या. तर युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी भगवा झेंडा दाखवत रवाना केले. यावेळी माजी महापौर विनिता राणे, शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोकणात गणेशोत्सव पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला जातो. गौरी गणपतीसाठी कोकणवासी मोठ्या प्रमाणावर गावी जातात. मात्र कोकणात जाणाऱ्या चाकमान्यांना तिकीटांसाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोकणवासीयांची ही समस्या लक्षात घेवून चाकमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध केली आहे.
कोकणवासीयांना निश्चित स्थळी जाण्यासाठी खेड दापोली, चिपळूण, गुहागर, माणगाव, महाड, राजापूर, लांजा, रत्नागिरी, देवरूख, मालवण, कुडाळ, वैभववाडी, देवगड, कराड, कोल्हापूर बस सेवेची व्यवस्था करण्यात आली.
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप असून देखील चाकरमान्यांसाठी आज कोकणात बस सोडल्या असून डोंबिवलीतुन सुमारे 2 हजार 500 प्रवासी कोकणात रवाना झाले आहेत. याबाबत एसटी ड्रायव्हर कंडक्टरचे आभार असून त्यांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचे दिपेश म्हात्रे यांनी सांगितले.
.jpg)



Post a Comment
0 Comments