Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण शिळ रस्त्यावरील रुग्णालयात अनर्थ टळला

 कल्याण शिळ रस्त्यावरील 

रुग्णालयात अनर्थ टळला



              ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर 


 रुग्णालयाच्या एसी आउट डोआरला अचानक आग
खिडकाळीतील जीवदानी रुग्णालयातील प्रकार
अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळवलं नियंत्रण


कल्याण शिळं रस्त्यावरील जीवदानी रुग्णालयात अनर्थ टळला आहे. रुग्णालयाच्या आउट डोआरला बुधवारी अचानक आग लागली होती. आगीची माहिती ठाणे मनपाच्या अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. मात्र सुदैवाने या आगीने रुग्णालयात प्रवेश केला नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

कल्याण शिळ रस्त्यावरील खिडकाळी गावाजवळ जीवदानी हे रुग्णालय आहे. रुग्णालयात रुग्ण असताना बुधवारी सायंकाळी अचानक एसीच्या आउट डोआरने पेट घेतला होता. अचानक लागलेल्या या आगीमुळे रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. त्यामुळे या आगीची माहिती तातडीने ठाणे मनपाच्या अग्निशमन दलाला देण्यात आली आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. सुदैवाने अग्निशमन दलाचे जवान वेळेत रुग्णालयात पोचल्याने अनर्थ टळला आहे.

Post a Comment

0 Comments