वृद्ध महिलेच्या मदतीला धावली शिवसेना
घरावर मोठे झाड कोसळून नुकसान झालेल्या महिलेला दिला मदतीचा हात
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
कल्याण नजीकच्या मोहने आंबेवाडी परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास निराधार असलेल्या जेष्ठ वुध्देच्या राहत्या घरावर आंब्याचे झाड पडून मोठे नुकसान झाले. डोईवरचे छप्पर गेले. या घटनेत दैव बलवत्तर म्हणून त्या बचवल्या. मोहने आंबेवाडी परिसरात राहणाऱ्या ७२ वर्षीय जेष्ठ नागरिक कोणाचाही आधार नसलेल्या पार्वती भाऊ आरोटे यांच्या घरावर लगतचे आंब्याचे झाड रात्री १०.१५ च्या सुमारास घरावर पडले. मोठा आवाज झाला. या घटनेत त्या सुखरूप बचवल्या पंरतु ऐन पावसाळ्यात बेघर होण्याचा मोठा प्रसंग त्याच्यावर ओढावला.
या घटनेची माहिती शिवसेना शिंदे गटाचे शाखा प्रमुख रोहन कोट यांना मिळताच तातडीने घटनास्थळी पोहचत अग्निशमन दलाच्या जवानाच्या मदतीने पडलेल्या झाडाचा डोलारा काढून वुध्देची विचारपूस करीत दिलासा दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वृद्धेच्या घराच्या छप्परावर नवीन पत्रे टाकून घराची डागडुजी करीत राहण्यास पुनश्च निवारा उपलब्ध झाल्याचे पाहून पार्वती भाऊ आरोटे वय वर्ष ७२ यांनी गहिवरून आले. शिवसेना मदतीला धावल्याचे कौतुक करत गोर, गरिबांच्या मदतीला शिवसेना धावते असे सांगितले.
.jpg)


Post a Comment
0 Comments