वाढदिवसाचा खर्च टाळून कृषि उत्पन्न बाजार समितीच्या रस्त्यांची केली डागडुजी
गिरीश पाटील यांचे व्यापारी आणि ग्राहक वर्गाने मानले आभार
युवा कार्यकर्त्याचा अनोखा आदर्श
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
आपल्या वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्त्यांची डागडुजी करत गिरीश पाटील या युवा कार्यकर्त्याने अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
सद्ध्या पावसाळ्याचे दिवस असून सतत पडणाऱ्या पावसामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडले असून याठिकाणी पाणी देखील साचले आहे. तर इतर ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये रोज हजारो व्यापारी आणि ग्राहकांची ये जा असते. यामुळे चिखलातून वाट काढत या सर्वांना मार्गक्रमण करावे लागते.
व्यापारी वर्ग आणि ग्राहकांनी आपली ही समस्या कांदा बटाटा मार्केटचे सचिव गिरीश पाटील यांना सांगितली असता, गिरीश पाटील यांनी आपल्या २१ ऑगस्ट वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळत येथील रस्त्याची डागडुजी करण्यास सुरुवात केली आहे. याठिकाणी खडी टाकून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता बनविण्यात येत असून यामुळे निदान पावसाळ्यात तरी येथे येणाऱ्या व्यापारी आणि ग्राहकांना दिलासा मिळणार असल्याचे गिरीश पाटील यांनी सांगितले. तर रस्त्यांची डागडुजी केल्याबद्दल येथील व्यापारी आणि ग्राहकवर्गाने पाटील यांचे आभार मानले आहेत.
.jpg)


Post a Comment
0 Comments