Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कडोंमपा आयुक्त यांनी अधिकारी वर्गाला खडसावले?


कडोंमपा आयुक्तांनी अधिकारी वर्गाला खडसावले

            ब्लॅक अँड व्हाईट/डोंबिवली बापू वैद्य 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत पण संबंधीत अभियंता चे दुर्लक्ष, अनेक तक्रारीचा पाऊस पडत आहे.त्याकडे काही संबंधात अधिकारी वर्ग लक्ष देऊन दुर्लक्ष करीत आहे हे सातत्याने येणाऱ्या तक्रारींवरून दिसत आहे ही गोष्ट मा आयुक्त मॅडम यांच्या लक्षात येऊ लागल्याने त्या स्वतः जातीने लक्ष घालून त्याविषयी संबंधात अधिकारी वर्गाला जाब विचारायला जात आहे.दिलेल्या कामात हलगर्जीपणा दिसला तर खपवून घेतला जाणार नाही.असा इशारा आयुक्त मॅडम यांनी संबंधित अभियंताना दिला आहे.त्यापुढे म्हणाल्या नागरिकांची गैरसोय करून काय साध्य होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.महापालिकेच्या क्षेत्रातील सर्व स्मशानभूमीची तातडीने पहाणी करून त्या युद्ध पातळीवर दुरूस्ती करण्याचे आदेश अभियंता वर्गाला दिले आहेत.कोणतेही कारण चालणार नाही तसेच कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.
मृत्यूनंतरही मरणयातना का?
वीस कोटींच्या निविदेतून ९स्मशानभूमीचे रुप पालटणार?
अनेक वेळा डोंबिवली मधील रामनगर येथील स्मशानभूमीची स्थानिक ज्येष्ठ नगरसेवक राजेश मोरे यांनी अनेक वेळा पाहणी केली असता व दुरुस्ती साठी पाठपुरावा करत आहेत.ते म्हणाले, शिवमंदिर येथील स्मशानभूमीचे नुतनीकरण करण्यासाठी पाच कोटी निधी उपलब्ध असून अद्यावत सुविधा देण्यात येतील त्याकडे अभियंता वर्गांने लक्ष केंद्रित करून मरणानंतर यातना होणार नाही हे प्रामुख्याने फक्त डोंबिवलीतील नव्हे तर केडीएमसी क्षेत्रातील सर्व स्मशानभूमीचा कायापालट झाला पाहिजे असे ही म्हटले.
योगेश गोटेकर उपअभियंता यांच्या शी संपर्क साधला असता ते म्हणाले फक्त डोंबिवली रामनगर शिवमंदिर येथील स्मशानभूमीच नव्हे तर केडीएमसी क्षेत्रातील सर्व स्मशानभूमीचा कायापालट होणार आहे व त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध झाला असून काम हाती घेण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments