Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पोलिसांनी असंविधानीक पद्धतीने कलमे लावल्याने पोलिसांचे कायदेविषयक अज्ञान समोर - ऍड. असीम सरोदे

 पोलिसांनी असंविधानीक पद्धतीने कलमे लावल्याने पोलिसांचे कायदेविषयक अज्ञान समोर - ऍड. असीम सरोदे 

                    ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर 

बदलापूर येथील शाळेत  चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेबाबत आज जेष्ठ कायदेतज्ञ ऍड. असीम सरोदे यांनी कल्याण कोर्टात येत पीडित मुलीच्या वतीने न्यायालयात आपली बाजू मांडली. पोलिसांनी असंविधानीक पद्धतीने कलमे लावल्याने पोलिसांचे कायदेविषयक अज्ञान समोर आले असून यामुळे गुन्हेगाराला सुटण्यास मदत होणार असल्याची टीका त्यांनी केली आहे. 

बदलापूर येथील चिमुकल्या  मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पीडितेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी जेष्ठ कायदेतज्ञ ऍड. असीम सरोदे हे कल्याण न्यायालयात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, आपण याप्रकरणी वकीलपत्र दाखल केले असून कल्याण कोर्टातील 15 ते 20 वकिल पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. या प्रकरणात काही कलमे चुकीची लावली असून अपुरे कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घाई केली असून कुटुंबियांचे म्हणणे नीट ऐकून न घेता हा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेला न्याय न मिळाल्यास त्याचे एकमेव कारण हे पोलीस असतील कारण पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर हा फॉल्टी असल्याचा आरोप सरोदे यांनी केला आहे. मुलीचे स्टेटमेंट हे बाल मानसोपचार तज्ञानी घेणे आवश्यक असतांना ते कॉन्स्टेबलने घेतलेले आहे. 

या प्रकरणात आरोपीला वाचविण्यासाठी राजकीय दबाव येत असून शाळेची प्रतिष्ठा वाचविण्यासाठी राजकीय दबाव दिला जात असून यामध्ये अत्याचार झालाच नसल्याचे दाखवून आरोपी हा मानसिक दृष्ट्या ठीक नसल्याचे दाखवून पोलीस असंविधानीक काम करत असल्याचा आरोप असीम सरोदे यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments