Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

चटका लावणारी एक्झिट !


 चटका लावणारी एक्झिट !

आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या विविध कंगो-यातून चित्रपट, नाटक, मालिका आदी माध्यमांद्वारे रसिक मनावर अधिराज्यच नव्हे तर प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे आपला माणूस म्हणून आपलेसे वाटणारे विजयजी कदम यांच जाण चटका लावणार, वेदनादायी. मराठी कला विश्वाच नुकसान करणार. 
टूर टूर, सही रे सही, इरसाल कार्टी, गंमत जंमत, पप्पा सांगा कुणाचे, तेरे मेरे सपने, दे दणादण, हळद रुसली.. नाव तरी किती सांगायची, मात्र अशा अनेक विविधांगी कलाकृतीतून त्यांनी केलेल्या दमदार भूमिका जशाच्या तशाच नजरेसमोर येतात आणि हृदयात रुतून जातात अभिनेत्यासह. अभिनेते विजयजी कदम यांच्या अभिनयातून सजलेली, साकारलेली एक एक कलाकृती म्हणजे कला विश्वातील टपोरा मोतीच याचा विसर रसिक मनाला कधीही पडणार नाही. 
वैशिष्ट्यपूर्ण संवादफेक, मुद्राअभिनय, अचूक टाइमिंग, भूमिकेतील लहान-सहान काना कोपरे शोधत ते लक्षवेधी करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होतं. विनोदी भूमिकांसह गंभीर भूमिका नाही ते यशोशिखरावर घेऊन जात अशी जबरदस्त ताकद असलेला कलावंत. व्यक्तिरेखेचा स्वभाव स्वतःमध्ये भिनवायची जबरदस्त शक्ती असणारा हा कलाकार. त्यांच्या खुमखुमीचा विसर तर रसिक मनाला कधीच विसरता येणार नाही. माणूस आणि माणुसकी जपणा-या आपल्या माणसास अभिनेते विजय कदम यांना भावपूर्ण आदरांजली.
विश्वनाथ पंडित 
ठाणे 

Post a Comment

0 Comments